Shiv Sena : पळपुट्यांना हिंदुत्ववीरांच्या पदव्या बहाल करणे महाराष्ट्राचा अपमान, रामदेव बाबा, मुख्यमंत्र्यांना टोला

Shiv Sena : बाबा रामदेवांची ही विधाने म्हणजे संतपदास डाग आहे,'असा टोला शिवसेनेने लगावला आहे.
ramdev baba, eknath shinde
ramdev baba, eknath shindesarkarnama

पुणे : शिवसेनेचे (shiv sena) मुखपत्र 'सामना'तून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, योगगुरु रामदेव बाबा (ramdev baba), भाजपवर टीका करण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी योगगुरु रामदेव बाबा यांनी मुंबईत शिवसेनेवर कडाडून हल्लाबोल केला होता. त्याला शिवसेनेचे चोख प्रत्युत्तर दिले आहे.

"हेच बाबा दिल्लीतील एका आंदोलनात मध्यरात्री ‘साडी-चोळी’ घालून मुलींच्या पंजाबी वेशभूषेत पळून गेले होते. हे भगोडे महाराष्ट्रात येऊन पळपुट्यांना हिंदुत्ववीरांच्या पदव्या बहाल करतात हा महाराष्ट्राचा आणि हिंदुत्वाचा अपमान आहे. महाराष्ट्रातील या बाबागिरीचा जादुटोणा या गणेशोत्सवात नष्ट व्हावा. श्री गणेशचरणी महाराष्ट्राचा हाच नवस आहे," असे 'रोखठोक'मध्ये म्हटलं आहे.

मुख्यमंत्री शिंदे हे हिंदुत्वाचे गौरव पुरुष असून शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे वारसदार आहेत, असे वक्तव्य रामदेव बाबा यांनी केले होते. त्यावर शिवसेनेने टीका केली आहे. 'रामदेव बाबा नावाचा एक तोतया व्यापारी संत गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येस मुंबईत अवतरला व त्याने शिंदेंना शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे वारसदार जाहीर केले. बाबा रामदेवांची ही विधाने म्हणजे संतपदास डाग आहे,'असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

ramdev baba, eknath shinde
Baramati जिंकण्यासाठी दोन वर्षे अगोदरच भाजपची मोर्चेबांधणी ; मताधिक्याची कोंडी फोडणे आव्हानात्मक!

कधीतरी याच बाबाने ‘मातोश्री’वर येऊन श्री. उद्धव ठाकरे यांनाही हिंदुत्वाचे खरे तारणहार असे प्रमाणपत्र बहाल केले होते, अशी आठवणही शिवसेनेने करून दिली आहे.

तोतयांचे हिंदुत्व..

ज्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात महाराष्ट्रातून झाली त्या महाराष्ट्राचे सार्वजनिक महत्त्व संपवले जात आहे. महाराष्ट्र हीच हिंदुत्वाची मूळ भूमी. वीर सावरकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व पहिले सरसंघचालक येथेच निर्माण झाले. त्या महाराष्ट्रात तोतयांचे हिंदुत्व मखरात बसवून पालखीत मिरवले जात आहे. पालखीचे भोई कोण हे काय श्री गणेशाला माहीत नाही.

ramdev baba, eknath shinde
Nirmala Sitharaman : अमेठीच्या करेट कार्यक्रमानंतर आता भाजपचे टार्गेट बारामती

पीडितांच्या रांगाच रांगा..

अदानी हे आता जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनलेत. कालपर्यंत हे स्थान मुकेश अंबानींचे होते. त्यावर आता अदानी आरूढ झालेत. एक भारतीय व्यक्ती जागतिक श्रीमंतांच्या यादीत सर्वोच्च स्थानी पोहोचली याचा आनंद आहे. पण एक व्यक्ती श्रीमंत झाल्याने देश आणि 130 कोटी जनता श्रीमंत होईल काय? श्रीमंतांच्या स्पर्धेत अदानी पुढे गेले. त्यांना कोणता देव नवसाला पावला तो पावला, पण मुंबई-पुण्यात नवसाच्या गणरायासमोर गोरगरीब, पीडितांच्या रांगाच रांगा वर्षानुवर्षे आहेत. त्या रांगा कमी करण्याचे कार्य अदानी, अंबानींसारख्या पन्नास श्रीमंतांनी केले तरी श्री गणेश उत्सवाचे कार्य मार्गी लागेल.

चमचेगिरीचे ‘मेळे’..

भाजप एखादा नाट्यप्रवेश रचतो व त्यानुसार पात्रे रंगमंचावर येतात व डायलॉग बोलून जातात. उद्या हे तोतया बाबा काश्मिरात जाऊन गुलाम नबी आझादांना भेटतील व जाहीर करतील, ‘‘तुम्हीच खरे राष्ट्रपुरुष व गांधी नेहरूंचे वारसदार!’’ राहुल गांधी सत्तेवर येत आहेत अशी चाहूल या बाबा लोकांना झाली तर ते सोनिया गांधींना राष्ट्रमाता व राहुलना नवे पंडित नेहरू म्हणून घोषित करतील. श्री गणेशाच्या उत्सवात हे असे चमचेगिरीचे ‘मेळे’ महाराष्ट्र खपवून घेणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in