सत्तेचे लोणी खाण्यासाठी शिवसेनेनं कंत्राटदारांची तळी उचलली ; दरेकरांचे टीकास्त्र

प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या मुंबईकरांचा शिवसेनेनं विश्वासघात केला आहे.
Pravin Darekar Latest Marathi News, uddhav thackeray News, Pravin Darekar News
Pravin Darekar Latest Marathi News, uddhav thackeray News, Pravin Darekar Newssarkarnama

मुंबई: महाविकास आघाडी सरकारचा भष्ट्राचार उघड करण्यासाठी सध्या भाजपकडून 'पोलखोल अभियान' सुरु आहे. कांदिवलीतील पांडे कंपाउंड व जानु पाडा येथे आज भाजपचे नेते, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी शिवसेनेवर (shiv sena) टीकास्त्र सोडलं आहे. (Pravin Darekar Latest Marathi News)

"गेल्या २५ वर्षाच्या कारकिर्दीत शिवसेनेनं मुंबई महापालिकेत सत्तेचे लोणी खाण्यासाठी कंत्राटदारांची तळी उचलली व प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या मुंबईकरांचा विश्वासघात केला आहे," असा घणाघात प्रवीण दरेकर यांनी केला आहे. याबाबत दरेकर टि्वट केलं आहे.

“गेल्या २५ वर्षाच्या कारकिर्दीत मुंबई महापालिकेत सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेनेने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. नाले सफाई, रस्ते दुरुस्ती, खड्डे या जनसामान्यांशी संबंधित विषयांमध्ये सत्तेचे लोणी खाण्यासाठी कंत्राटदारांची तळी उचलली व प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या मुंबईकरांचा विश्वासघात केला," असे दरेकर म्हणाले. भाजपचे नेते आशिष शेलार यांनीही महाविकास आघाडीवर निशाना साधला आहे.

Pravin Darekar Latest Marathi News, uddhav thackeray News, Pravin Darekar News
आघाडीतील नेत्यांनी योगींचा क्लास लावावा ; आशिष शेलारांचा टोमणा

"उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दमदार नेतृत्व आहे. आता राज्यातील नेत्यांनी योगींच्या क्लास लावावा," अशा शब्दात आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे. "मुंबईत भाजप स्वबळावर लढेल. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे भाजपच्या काही नेत्यांचे जवळचे मित्र आहेत," असे शेलार म्हणाले.

"राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याची ऑफर असताना आम्ही नीती नियमात चाललो. माणसाचे आणि पक्षाचे रंग कसे बदलतात हे राज्याने पाहिले आहे. २०१४ ला शिवसेनेचा दारुण पराभव झाला होता. आधी वलग्ना करत होते आणि मग हात जोडून आम्हाला घ्या, असे सांगत होते. तुम्ही तिघे एकत्र आला तरी आम्ही पटकी देऊ आणि राज्य पूढे घेऊन जाऊ," असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला आहे.

Pravin Darekar Latest Marathi News, uddhav thackeray News, Pravin Darekar News
फेसबूक पोस्ट शेअर करुन भाजप नेत्यानं संपवलं आयुष्य..

"राजकारणात काहीही होते जे काल हिंदुत्ववादी होते ते आज सेक्युलर झाले.जे काँग्रेसचे तोंड देखील बघत नव्हते ते त्याच्या फोटोसमोर झुकताना पाहिले. आम्हाला सरकार पाडण्यात रस नाही. आता तीन गडी विरुद्ध एक असा सामना आहे.पण सामना आम्ही जिंकू," असे शेलार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com