Shiv Sena : शिंदे गटाआधीच उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगाकडे धाव

शिंदे गटाच्या बंडानंतर आता धनुष्यबाण चिन्हासाठी शिवसेनेत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Shivsena News, Uddhav Thackeray News, Political News Updates in Marathi
Shivsena News, Uddhav Thackeray News, Political News Updates in Marathi Sarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदारांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत वादळ उठलं आहे. विधिमंडळात आपणच शिवसेना (Shiv Sena) असल्याचा दावा शिंदे गटाने केल्यानंतर त्याला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली आहे. आता शिंदे गटाकडून पक्षाच्या धनुष्यबाण या चिन्हावर दावा सांगितला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण त्याआधीच शिवसेनेने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. (Shiv Sena Latest Marathi News)

मागील काही दिवसांत राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. शिंदे गटाच्या बंडानंतर शिवसेना नेमकी कुणाची, यावर बरेच तर्कवितर्क लढवले जात आहेत. राज्याच्या काही नगरसवेक, पदाधिकारी शिंदे गटाला समर्थन जाहीर करत आहेत. तर ठाकरेंकडूनही शिवसैनिकांच्या समर्थनासाठी प्रयत्न केले जात आहेत.

Shivsena News, Uddhav Thackeray News, Political News Updates in Marathi
आदित्य ठाकरेंवर तातडीनं कारवाई करा; बाल हक्क आयोगाचे पोलिसांना आदेश

दोन्ही बाजूने शिवसेना आपलीच असल्याचा दावा केला जात आहे. पण प्रत्यक्ष दोन्ही बाजुला चिन्हा कुणाला मिळणार, याबाबत साशंकता आहे. ठाकरे यांनी धनुष्यबाण आपल्याकडे राहणार असल्याचे ठामपणे सांगितले जात आहे. तर शिंदे गटाकडून चिन्हावर दावा सांगितला जात आहे. त्यांच्याकडून निवडणूक आयोगाकडेही धाव घेतली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पण शिंदे गटाआधीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावतीने निवडणूक आयोगाकडे अर्ज करण्यात आला आहे. आपली बाजू ऐकून घेतल्याशिवाय पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेता जाऊ नये, अशी मागणी ठाकरे यांनी आयोगाकडे केली आहे. शिंदे गटाकडून चिन्हावर दावा सांगितल्यानंतर आयोगाकडून याबाबतची प्रक्रिया सुरू केली जाईल.

Shivsena News, Uddhav Thackeray News, Political News Updates in Marathi
सर्वोच्च न्यायालयाने नवीन अध्यक्षांना रोखले अन्यथा न्याय मिळाला नसता!

शिवसेनेचं चिन्ह जाणार नाही

दोन तृतियांश आमदार फुटले तरी त्यांना गट बनून राहता येत नाही. त्यांना कुठल्यातरी पक्षात विलीन व्हावे लागते. ते जे म्हणत आहेत की आम्ही शिवसेना आहोत, हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. तो एवढ्या लवकर ठरणार नाही. शिवसेनेचे चिन्ह कुठल्याही परिस्थितीत जाणार नाही. कारण शिवसेना हा चाळीस आमदारांनी झालेला पक्ष नाही. हा 36 लाख सदस्यांचा पक्ष आहे. सदस्यसंख्येवर पक्ष बनला जातो. आमदार आणि खासदारांवर पक्ष बनत नाही. पक्ष हा सर्वसाधारण कार्यकर्त्यांच्या नोंदणी, सदस्यसंख्येवर किती आहे, यावर सगळे अवलंबून आहे, असं शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com