विधानसभेच्या निवडणुकीला तयार! उद्धव ठाकरेंनी थेट आव्हान दिलं...

उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीनंतर जनतेचा निर्णय आम्हाला मान्य असेल, असं म्हटलं आहे.
Eknath Shinde News, Shivsena News, Uddhav Thackeray Latest Marathi News
Eknath Shinde News, Shivsena News, Uddhav Thackeray Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : राज्यात मागील दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्यामध्ये शिवसेनेला (Shiv Sena) मोठा झटका बसला आहे. 55 पैकी 40 आमदारांनी बंड करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडायला भाग पाडली. त्या खुर्चीवर आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) विराजमान झाले आहेत. शिवसेनेने बंडखोर आमदारांबाबत कायदेशीर लढाईही सुरू केली आहे. पण हे खेळ करण्यापेक्षा थेट विधानसभा निवडणुका होऊ द्या, असं आव्हान ठाकरे यांनी दिलं आहे. (Uddhav Thackeray Latest News)

ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपला आव्हान दिल्याचे मानले जात आहे. शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे म्हणाले, एवढं सगळं देऊनही असं का वागला, याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. पण सर्वसामान्य जनतेला मला धन्यवाद द्यायचे आहेत. ही लोकं हळहळ करत आहेत. जे घडलं ते त्यांना मान्य नाही.

Eknath Shinde News, Shivsena News, Uddhav Thackeray Latest Marathi News
शिवसेना अन् धनुष्यबाण कुणाचा? अखेर उद्धव ठाकरेंनी बाण सोडला...

हे खेळ करण्यापेक्षा परत विधानसभेची निवडणूक घ्या. आम्ही चूक केली असेल तर जनतेचा निर्णय आम्हाला मान्य असेल, आम्ही घरी बसू. त्यांनी अडीच वर्षापुर्वी हे केले असते तर त्यावेळीच सन्मानाने झाले असते, असंही ठाकरे म्हणाले. एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे पत्र दोन खासदारांनी दिले आहे. त्यावर मी माझ्या नेत्यांशी, खासदारांशी बोलून काही मुद्यांवर निर्णय घेईन, असंही ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

न्यायालयीन लढाईवर बोलताना ठाकरे म्हणाले, माझ्या न्यायमंदिरावर विश्वास आहे. न्यायालयात जो निकाल लागेल, तो केवळ शिवसेनेच्या भवितव्याचा नसणार आहे. तर देशात लोकशाही किती मजबूत राहणार आहे, राज्यघटनेनुसार देशातला कारभार यापुढे होणार की नाही, दिशा दाखवणार हा निकाल असेल.

देशाचं लक्ष या प्रकरणाच्या निकालाकडे आहे. आपला देशात लोकशाहीची ताकद किती शिल्लक राहिली आहे. लोकशाहीचे चार स्तंभ आपली कर्तव्य कोणत्याही दडपणाला बळी न पडता न्याय देणार की नाही, याकडे लक्ष आहे, असंही ठाकरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com