"संजू आत्याच्या जाण्याने शेवटचा दुवा निखळला; ठाकरे कुटुंबाने मायेचे छत्र गमावले" : CM ठाकरे

CM Uddhav Thackeray | Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडूनही शोक व्यक्त
"संजू आत्याच्या जाण्याने शेवटचा दुवा निखळला; ठाकरे कुटुंबाने मायेचे छत्र गमावले" : CM ठाकरे
CM Uddhav Thackeray | Balasaheb Thackeray Sarkarnama

पुणे : जेष्ठ समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या कन्या आणि शिवसेनाप्रमुख (Shivsena) दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balsaheb Thackeray) यांच्या लहान भगिनी संजीवनी करंदीकर यांचे आज पुण्यात निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. आज सकाळी वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर संध्याकाळी ५ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. (Sanjeevani Karandikar passed away)

करंदीकर यांना काल सायंकाळी दीनानाथ हॉस्पिटल दाखल केले होते, मात्र आज सकाळी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी करंदीकर कुटूंबियांचे फोनवरुन सांत्वन केले. दरम्यान, त्यांच्या अंत्यसंस्काराला संध्याकाळी ठाकरे कुटुंबिय उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

CM Uddhav Thackeray | Balasaheb Thackeray
ठाकरे कुटुंबियांवर शोककळा; बाळासाहेबांच्या सख्ख्या बहिणीचे पुण्यात निधन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शोक

त्यापूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांच्या आत्याच्या निधनानंतर तीव्र शोक व्यक्त केला आहे. ते शोकसंदेशात म्हणतात, संजीवनी करंदीकर या आमच्या आत्या होत्याच, पण प्रबोधनकार ठाकरे यांच्या कन्या व शिवसेनाप्रमुखांच्या भगिनी होत्या. त्यांना एक समृद्ध वारसा लाभला व त्यांनी तो शेवटपर्यंत जपला. त्यांच्या जाण्याने शेवटचा दुवाही निखळला. संजूआत्या म्हणून त्या ठाकरे कुटुंबात प्रख्यात होत्या.

प्रबोधनकारांप्रमाणेच त्या परखड होत्या. वाचनाचा छंदही अफाट होता. प्रबोधनकारांच्या अनेक गोष्टी त्या आम्हाला सांगत. सगळ्यात छोटी बहीण म्हणून शिवसेनाप्रमुखांचा संजू आत्यावर विशेष लोभ होता व संजू आत्याही आम्हा सगळ्यांना तेवढ्याच मायेने वागवत आल्या. त्यांच्या जाण्याने ठाकरे कुटुंबाने मायेचे छत्र गमावले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!

CM Uddhav Thackeray | Balasaheb Thackeray
आम आदमीचे लक्ष्य महाराष्ट्र; विदर्भातील 'बडा' नेता पंजाबमधून राज्यसभेवर जाण्याची शक्यता

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडूनही संजीवनी करंदीकर यांना श्रद्धांजली :

अजित पवार म्हणाले, संजीवनीताईंच्या माध्यमातून प्रबोधनकारांच्या तसंच बाळासाहेबांच्या अनेक वैयक्तिक आठवणींना उजाळा मिळायचा. त्यांच्या निधनानं बाळासाहेबांच्या भावंडांतील अखेरचा दूवा निखळला आहे. ठाकरे व करंदीकर कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी असून हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांच्या परिवाराला मिळो. संजीवनीताईंच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.