उद्धव ठाकरेंचा एक घाव दोन तुकडे; बंडखोर आमदारांचे परतीचे दोर कापले

उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांचा चांगलाच समाचार घेतला.
CM Uddhav Thackeray News, Shivsena News, Maharashtra Political Crisis
CM Uddhav Thackeray News, Shivsena News, Maharashtra Political CrisisSarkarnama

मुंबई : शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी बंडखोर आमदारांवर चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. आमच्याबद्दल या आमदारांना प्रेम वाटत असल्याबद्दल धन्य झालो. पण तेच माझ्यावर अश्लाघ्य भाषेत टीका होत असताना दाखवायला हवे होते. त्यावेली कोणीच बोलले नाही. आज त्यांच्याच मांडीवर जाऊन बसले आहेत, अशा शब्दांत ठाकरे यांनी बंडखोर आमदारांचा समाचार घेतला. (Uddhav Thackeray Latest News)

ठाकरे यांनी एक घाव दोन तुकडे करत बंडखोर आमदारांचे परतीचे दोर कापल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. भाजपसोबत पुन्हा जाणार नसल्याचे संकेत ठाकरे यांनी दिले. मातोश्रीतून सन्मानाने बोलावणे आले तर जाऊ, असं वक्तव्य काही आमदारांनी केलं आहे. त्यावर शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले, अनेकजण गप्प असलेले आता बोलायला लागले आहेत. मातोश्रीने सन्मानाने बोलावले आणि भाजपशी (BJP) जुळवून घेण्यास तयार असतील तर आम्ही यायला तयार असल्याचे सांगत आहे.

CM Uddhav Thackeray News, Shivsena News, Maharashtra Political Crisis
विधानसभेच्या निवडणुकीला तयार! उद्धव ठाकरेंनी थेट आव्हान दिलं...

माझ्याबद्दल, आदित्यबद्दल त्यांना त्यांना अजूनही प्रेम वाटत असल्याने मी धन्य झालो. तेच प्रेम गेली दोन-अडीच वर्षे का दाखवले नाही? जो पक्ष माझ्यावर अश्लाघ्य भाषेत टीका करत होते, त्यांच्यावर हे लोक बोलले नव्हते. त्यावेळी दातखीळ बसली होती का, असा सवाल ठाकरेंनी केला.

आजपर्यंत आमच्यावर बोलायची कुणाची हिमंत नव्हती. पण ज्यांनी विकृत भाषेत टीका केली, त्यांच्या गाठीभेटी हे घेत आहात. त्यांच्या मांडीवर बसत आहात. हे प्रेम तकलादू आहे का. हे प्रेम खरं की खोटं हे जनतेला कळू द्या, असं टोला ठाकरे यांनी लगावला.

CM Uddhav Thackeray News, Shivsena News, Maharashtra Political Crisis
शिवसेना अन् धनुष्यबाण कुणाचा? अखेर उद्धव ठाकरेंनी बाण सोडला...

मला कुठेही वादविवाद होऊ द्यायचा नाही. यापूर्वी मी त्यांना परत येण्याचे आवाहन केले आहे. ज्यांनी आमचे अपमान केले, अत्यंत वाईट वागले. त्यांच्यासोबत जाऊन तुम्हाला आनंद मिळत असेल तर तो आनंद तुम्हाला लखलाभ, असं सांगत ठाकरे यांनी बंडखोरांना खडसावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com