Maharashtra Budget : शिवसेना-भाजपची पुढील रणनिती तयार; गोगावले म्हणाले...

BJP-Shivsena : आमदारांच्या मतदारसंघातील कामकाजाचा आढावा घेणार
Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama

Maharashtra Budget Session 2023 Live : भाजप आणि शिवसेना आमदारांची उद्या सकाळी दहा वाजता बैठक होणार आहे. बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदारांना मार्गदर्शन करतील. त्यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत रणनिती आखण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे. दरम्यान या बैठकीत आमदारांच्या मतदारसंघातील कामकाजांचा आढावा घेणार असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस पूर्ण झाला आहे. त्यानंतर शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी उद्याच्या बैठकीबाबत माहिती दिली.

ते म्हणाले, "उद्याच्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांबाबत चर्चा करण्यात येईल. तसेच अर्थसंकल्पाबाबतही चर्चा केली जाणार आहे."

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Wadettiwar : … तर या देशात लोकशाही फक्त नावालाच राहील, असं का म्हणाले वडेट्टीवार ?

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरूवात झाली आहे.  दरम्यान आज पहिल्या दिवशी अनेक कारणांनी हे अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे या बाळाला घेऊन विधिमंडळात दाखल झाल्या होत्या. तेथे बाळासाठी स्थापन केलेल्या हिरकणी कक्षात सोयी-सुविधा नसल्याने अहिरे यांनी नाराजी व्यक्त केली. या धुळीत माझ्या बाळा ठेऊ शकत नाही. त्यामुळे मला जावे लागत आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Ravindra Dhangekar : 'कसब्यात मुख्यमंत्री शिंदे पैसे वाटत फिरत होते' ; धंगेकरांचे खळबळ उडवून देणारे आरोप!

शिंदे -फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडत आहे. दरम्यान मागील हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष यांच्याविरोधात आणला गेलेला अविश्वास प्रस्ताव, आज अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rajul Narvekar) फेटाळून लावला आहे. त्यानंतर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यावर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राज्याचे एक शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींची भेट घेईल, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Latur News : फडणवीसांच्या आशीर्वादाने पवार-चौगुलेंनी ‘किल्लारी’चे शिवधनुष्य पेलले; पण...

दरम्यान, काल शेतकरी, विद्यार्थी, कायदा आणि सुव्यवस्थेबाबत सरकारची कोंडी करण्याचा इशारा विरोधकांनी दिला होता. त्यावर विरोधकांचा समाचार घेऊ, असे थेट आव्हानही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते.

अधिवेशनात विविध प्रश्नांवरील चर्चेनंतर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी 'पॉईंट ऑफ प्रोसिजर'व्दारे सभागृहात गंभीर आरोप केला. सभागृहाचे कामकाज शिस्तीत आणि नियमात चालवण्याची पवार यांनी सूचना केली.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचा निर्धार मेळाव्यात शिंदे सरकारवर जोरदार 'बॅटिंग'

अजित पवार यांनी सांगितले की, विधीमंडळ सभागृहांचे कामकाज संविधान, नियम आणि परंपरेनुसार चालत आले आहे. अलीकडच्या काळात मात्र अनेक नियमांना बगल दिली जात असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच त्यांनी विधिमंडळ सदस्यांच्या व्यथाही मांडल्या. विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनीही पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची दखल घेत योग्य ती सुधारणा करण्याच्या सूचना केल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in