राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं ठरलंय; काँग्रेसने ध्यानात घेतलयं का?

देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका (Assembly Election) जाहीर झाल्या आहेत.
NCP-Shivsena-Congress
NCP-Shivsena-CongressSarkarnama

मुंबई : देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका (Assembly Election) जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजवला आहे. गोव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढणार आहे. मात्र, काँग्रेसचे (Congress) अजून ठरत नसल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले.

संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, गोव्यात आणि उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढण्याचा शिवसेनेचा विचार आहे. त्यानुसार आमची तयारी सुरू आहे. आमचे पोस्टर, ॲडव्हर्टायझिंग दिसत नसतील मात्र, आमचे विचार मजबूत आहेत. गोव्यामध्ये युती व्हावी असा आमचा विचार आहे. काँग्रेसने आमच्या सोबत राहावे म्हणून मी स्वता: बोलणी केली. मात्र, काँग्रेसला वाटत असेल की त्यांना स्वबळावर सत्ता मिळेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र, आम्ही काही दिवस प्रयत्न सुरू ठेवू, असे सूचक व्यक्त त्यांनी केले.

NCP-Shivsena-Congress
बिगुल वाजला! उत्तर प्रदेशात 7 टप्पे, मणिपूर 2 तर पंजाब, गोवा, उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात मतदान

वेळेनुसार निवडणुका होत आहेत. निवडणूक आयोगाने पूर्ण तयारी करून हा निर्णय घेतलेला आहे. निवडणूक घेणे गरजेच आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर करताना आयोगाने जाहीर प्रचार सभांवर बंदी घतली आहे. त्यावर राऊत म्हणाले जाहीर सभांवर बंदी घातली आहे ती बंधने सर्वांसाठी असावीत. पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या लाटेचा कहर असताना सर्वच पक्षांनी कशाप्रकारे तिथे प्रचारसभा घेतल्या. विशेष करून पंतप्रधानांनी कशाप्रकारे मोठ्या सभा घेतल्या, अशी अठवण त्यांनी करुन दिली. पंजाबमध्ये जे घडले त्यानंतर आम्हाला पंतप्रधान नरेंद मोदी यांची चिंता वाटते, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

काही ठिकाणी अनेक टप्प्यांमध्ये व काही ठिकाणी एकाच टप्प्यात निवडणूक ही राजकीय पक्षांची सोय पाहिली जात आहे, असा आरोप त्यांनी केला. आम्ही पश्चिम बंगालमध्ये सुद्धा हेच पाहिले. काही पक्षांना पुरेसा वेळ मिळावा म्हणून या केलेल्या तडजोडी असाव्यात, असेही ते म्हणाले. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना जर इतका आत्मविश्वास असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. जेव्हा मनोहर पर्रिकर होते तेव्हा ते 13 वरच थांबले होते. प्रमोद सावंत हे काय पर्रिकरांपेक्षा मोठे नाहीत. इथून तिथून घेतलेली लोक आहेत, त्यांचा स्वतःचा पक्ष कुठे आहे, असा टोला राऊत यांनी सावंत यांना लगावला.

NCP-Shivsena-Congress
महेश लांडगेंचे कोल्हे-आढळरावांना आवाहन; उद्धव ठाकरे अन् अजितदादांकडे पाठपुरावा करा!

कधीकाळी गोव्यामध्ये भाजपचा सरपंच काय पंचही नव्हता. मात्र, मुख्यमंत्री झाले ना सरपंच असण्याचा आणि नसण्याचा काही फरक पडत नाही. मतांची विभागणी व्हावी म्हणून भाजपने विरोधी पक्षांच्या काही लोकांना हाताशी धरले का अशी शंका मला येत आहे. गोव्याच्या लोकांमध्ये संताप आहे, असेही राऊत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in