राजकारण तापलं! कदमांच्या टीकेनंतर शिवसेना आक्रमक, राज्यात फिरून दाखवा...

Ramdas kadam| Sushma Andhare| मिनाताई ठाकरे यांनी ज्या काळजीने तुमची सरबराई केली. त्यांच्याच चारित्र्यावर तुम्ही शिंतोडे उडवले
Ramdas kadam| Sushma Andhare|
Ramdas kadam| Sushma Andhare|

मुंबई : शिंदे गटाचे आमदाक रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका केली होती. या टीकेनंतर आता राज्यभरातील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यातच शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तर, रामदास कदमांनी राज्यात कुठेही फिरून दाखवावे, शिवसेना त्यांना उत्तर देईल, असा थेट इशारा दिला आहे.

Ramdas kadam| Sushma Andhare|
Patra Chawl Case : 'पत्राचाळ' सहभागाच्या आरोपावर शरद पवार यांचे स्पष्टीकरण, म्हणाले..

रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. “बाळासाहेब ठाकरे म्हणत असतील माझा मुलगा शरद पवार, सोनिया गांधींच्या नादाला लागून बिघडला. आमचे उद्धव ठाकरे राष्ट्रवादीची भांडी घासत आहेत, तर त्यांचा मुलगा खोके खोके म्हणत टुणटुण उड्या मारत फिरत आहे. मी बाळासाहेबांचा मुलगा आहे असं किती वेळा सांगणार? आम्ही कधी नाही म्हटलं का? उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगा नाही, असं कधी कोणी म्हटल्याचं तुम्ही ऐकलं का? तुम्हाला बाळासाहेबांचं नाव का सांगावं लागतं? तुमचं काही कर्तृत्व आहे का?” अशी जहरी टीका रामदास कदम यांनी केली होती.

या टीकेनंतर सुषमा अंधारे यांनी रामदास कदम यांच्यावर हल्लाबोल केला आहे. उद्यापासून रामदास कदमांच्या विरोधात शिवसेनेकडून आंदोलन सुरु करत आहोत. तुम्ही महाराष्ट्रात फिरुन दाखवाच, असा थेट इशाराच सुषमा अंधारे यांनी दिला आहे. आतापर्यंत रश्मी ठाकरे तर सोडाच पण उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा शिवसेनेतील कोणत्याही नेत्याने तुमच्या कामावर, ध्येय धोरणांवर टीका केली, तुमच्या कामाच्या पद्धतीवर टीका केली, पण तुमच्या कुटूंबावर कोणी कधीही टीका केली नाही. पण तुम्ही त्या वैयक्तिक पातळीवर घसरता. किमान जाणीव तरी ठेवा. सरड्यापेक्षा जास्त वेगाने तुम्ही रंग बदलताय.

ज्या लोकांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात तेच लोक तुमच्या निष्ठेवर बोलतात, तुमचा पगार किती, तुमची निष्ठा किती, तरीही तुम्ही ऐकून घेता. ज्या भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलात त्या भाजपच्या नेत्यांना कधी प्रश्न का नाही केला. अमृता फडणवीस जेव्हा उद्धव ठाकरेंवर टीका करत होत्या, त्या भाजपच्या कार्यकर्त्या आहेत का हा प्रश्न विचारायला तुमच तोंड नाही उचकटलं का, असा सणसणीत सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.

Ramdas kadam| Sushma Andhare|
NCP: ‘पन्नास खोके एकदम ओके’च्या घोषणा!

रश्मी ठाकरे या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अधिकृत पदाधिकारी आहेत.पण तेही तुमच्या डोळ्यात खुपलं. तुम्ही हे सांगा ना तुमचा मुलगा आमदार कसा झाला.तुमचा मुलगा आमदार आणि तुम्ही ज्यांना मुख्यमंत्री केलं त्यांचा मुलगा खासदार, म्हणजे तुमचं ठेवता झाकून आणि दूसऱ्याचं बघता वाकून, असा खोचक टोलाही अंधारे यांनी लगावला आहे.

''रामदास कदम यांच्यावर मानसिक परिणाम झाला असून त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांचे मानसिक संतूलन ढासाळल्याने त्यांनी धसका घेतला आहे. टीका करायला पाहिजे पण टीका करताना पातळी किती खाली यावी याचही भान राहिलं पाहिजे.

मी बाळासाहेबांचा मानसपुत्र आहे असे म्हणत होता. पण काल टीका करताना त्याच बाळासाहेबांवर आणि मॉंसाहेबांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवावेत, तुमची इतकी मजल जावी की ज्या मातोश्रीने तुम्हाल आईच्या प्रेमाने सांभाळलं, मातोश्रीने कधीही तुम्हाला उपाशीपोटी बाहेर पडू दिले नाही. मिनाताई ठाकरे यांनी काळजीने तुमची सरबराई केली. त्यांच्याच चारित्र्यावर तुम्ही शिंतोडे उडवत आहात. पण आता रामदास कदमांनी राज्यात कुठेही फिरावं, शिवसेना त्यांना उत्तर दिल्याशिवा राहणार नाही,’ असा इशाराच अंधारे यांनी कदमांना दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in