त्यांच्या रक्तात शिवसेना कधीच नव्हती, गद्दारी करुन त्यांनी सत्ता मिळवली ; ठाकरेंचा हल्लाबोल

शिवसेना हललेली नाही, हलले आहेत ते ज्यांना अपचन झालं आहे.
Aditya Thackeray
Aditya Thackeray sarkarnama

ठाणे : शिवसेनेचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या शिव संवाद यात्रेला आजपासून प्रारंभ झाला. भिवंडी येथे शिवसेनेच्या (shivsena) मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेनंतर आता शिव संवाद यात्रेला सुरुवात केली आहे. (Aaditya Thackeray latest news)

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर त्यांनी यावेळी निशाणा साधला. त्यांनी बंडखोर आमदारांवर भाष्य करताना खंत व्यक्त केली. आदित्य ठाकरे म्हणाले, "शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजारी असताना बंडखोरांनी गद्दारी करीत सत्ता मिळवली. 'त्यांना' काय कमी दिलं ? कुटुंबाप्रमाणे वागवलं, आपली महिला आघाडी आहे, युवासेना आहे, सगळे आहेत. शिवसेना हललेली नाही, हलले आहेत ते ज्यांना अपचन झालं आहे. ठाणे, पालघर, भिवंडी ज्यांना जे जे देऊन बसलो, ते मस्त तिकडे आरामात बसले आहेत. त्या लोकांचं ऐकून आम्ही ज्यांच्यावर अन्याय केला ते निष्ठावंत लोक आमच्यासोबत आहेत,"

Aditya Thackeray
presidential elections result: मुर्मू आघाडीवर, खासदारांची मिळवली 540 मते

"आजचा उत्साह बघून वाटतं हेच खरं शिवसेनेचं प्रेम आहे. महिनाभरापासून दुःखदायक वातावरण आहे. हे विसरण्यासाठी शिवसंवाद यात्रा काढली आहे. तुम्हाला शिवसैनिकांना भेटण्यासाठी ही यात्रा काढली आहे. ज्यांना आपण पुढे आणलं, ओळख दिली, मंत्रिपदं दिली. पण ते आपल्याला सोडून गेले, गद्दारी केली, हे तुम्हाला तरी पटणारं आहे का? जे काही महाराष्ट्रात सुरू आहे ते राजकारण म्हणून तुम्हाला पटणारं आहे का?" असा सवाल आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.

ठाकरे म्हणाले, " मागच्या अडीच वर्षात सरकार आपलं असताना कोणताही धार्मिक भेदभाव न करता, जातीपातीचं राजकारण न करता विकासाची कामे केली. राज्याची २४ तास सेवा केली. राजकारण कमी केलं ही आपली चूक झाली. आपण कधी राजकारण केलं नाही, सत्तेत असताना कधी विरोधकांना त्रास दिला नाही. स्वतःच्या आमदार खासदारांवर नजर ठेवली नाही. ठेवला तो विश्वास आणि तो अंधविश्वास होता. तोच आज धोका देऊन गेला आहे,"

"जे गेलेत त्यांच्यात शिवसेना कधीच नव्हती, त्यांच्या रक्तात शिवसेना कधीच नव्हती. ते बोलतात आम्ही उठाव केला, बंड केलं, पण त्यांनी गद्दारी केली, हा उठाव नाही. ते 'गद्दार' हेच माथ्यावर घेऊन फिरणार आहेत. आज सर्वसामान्य माणूस आम्हाला येऊन भेटत आहेत आणि सांगताहेत उद्धव ठाकरे चांगला माणूस आहे, सज्जन माणूस आहे," असे ठाकरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com