उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरूवात; ठाकरी तोफेच्या निशाण्यावर कोण?

Shivsena :
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama

मोहन भागवत काही दिवसांपुर्वी मशिदीत जावून आले. ते  संवाद करायला गेले आहेत. तेव्हा तेथील मुसलमान म्हणाले ते राष्ट्रपीता आहेत. मी त्यांचा आदर करतो. आम्हीही त्यामुळे त्यांना राष्ट्रपती करा म्हणत होतो. काही वेगळ बोललो होतो का?, असा सवालही ठाकरेंनी आपल्या भाषणात केला. 

देशाचा शहिद जवान औरंगजेब यांच्या शौर्याचा उल्लेख करत ठाकरे यांनी आपलं हिंदूत्व सांगण्याचा प्रयत्न केला.  

आमच हिंदूत्व हे शेंडी आणि जाणवधारी नाही. जे हिंदूत्व म्हणून बोलत आहेत. त्यांनी एका व्यासपीठावर याव आणि त्यांनी ते हिंदूत्व सांगावं...मी आमचं बाळासाहेबांचं हिंदूत्व सांगितलं आहे. 

उद्या  परवा त्यांंच्या सरकारला १०० दिवस होणार आहे. पण यातील ९० दिवस हे ते दिल्लीलाच गेले होते....

अमित शहा देशाचे गृहमंत्री की भाजपचे गृहमंत्री आहेत. या राज्यात त्या राज्यात नुसत्या काड्या करत असतात. 

देशाच चलन खाली खाली चालत आहे. तेव्हा सुषमा स्वराज्य म्हणाल्या होत्या. की जेव्हा चलन घसरत तेव्हा देशाची देखील पत घसरत असते, असे त्या म्हणाल्या होत्या...

बाप चोर आणि कोंबडी चोरांवर काय बोलायचं. हे आपलंं पवित्र व्यासपीठ आहे. मी यामध्यमातून विचार देत आहे.

होसबाळे यांच मी अभिनंदन करतो. त्यांनी रोजगारी, विकासावर बोलण्याचं धाडस केलं आहे.  

पाकिस्तानच्या जीनाच्या थडग्यावर जाणाऱ्यांच्या अवलादींनी आम्हाला हिंदूत्व शिकवू नये, अशा शब्दात पंतप्रधान मोदींच नाव न घेता भाजपवर घणाघात केला आहे. 

गटात जाण्यासाठी धमक्या येत आहेत. धमक्या येत आहेत. हा कायदा आहे का? जोपर्यंत शिवसैनिक शांत आहेत तोपर्यंत शांत आहे. त्यांना शांतच राहूद्या...शिवतीर्थावरील मेळावा हा जिवंत मेळावा आहे. तिकडे ग्लिशरीनच्या बाटल्या आणि रडगाणी तिकडे गेली आहेत....

आज मी टोमणा मारला नाही. मी पुन्हा येईन म्हणणारे उपमुख्यमंत्री म्हणून आले. ते सद्गृहस्त आहेत, ते आभ्यासू आहेत. हा टोमणा नाही, अशा शब्दात त्यांनी फडणवीसांची खिल्ली उडवली... 

आज आनंद दिघे यांना आठवत आहे. ते एकनिष्ठ होते. भगव्यात गेले. 

आई वडिलांची शपथ घेऊन सांगतो की, मी शहांना जे सांगितलं तेच सांगितलं होत...तेव्हा ते पण पहिल्या ७ जणांमध्ये होते. तेव्हा बोलायच होत ना..., अशा शब्दात ठाकरेंनी शिंदेंवर टीकेचा बाण सोडला... 

बाप मंत्री कारट खासदार ...

ही शिवसेना एकनिष्ठांची शिवसेना आहे. मी राजीनामा देतो. मात्र तुमच्यापैकींनी सांगाव..., अशा शब्दात ठाकरे यांनी शिंदेंवर टीका केली.  

पण त्यांनी ध्यानात ठेवावे. की मी उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. मी ज्यांना काही देवू शकलो नाही. ते माझ्यासोबत आहेत.  

दरवर्षी परंपरेनुसार दहन होणार आहे. यंदाही होणार आहे. यंदाचा रावण वेगळा आहे. यंदाचा रावण खोक्याचा आहे. कट्टप्पा म्हणून शिंदेंचा उल्लेख.

तुमच्या बुडाला आता मंत्रीपद आहेत. पण तुम्ही गद्दारच आहेत. इकडे तासाने किंवा भाड्याने आणलेले माणसं नाहीत. त्यांना विचारा. तिकडे एक एक एकटाच आहे. मात्र इथे एकनिष्ठ आहेत. 

मुख्यमंत्री म्हणून तुमच्या आशीर्वादाने काम केले. अजूनही डॅाक्टरांनी मला वाकायला सांगितले नाहीत. मात्र, मी तुमच्या पुढे नतमस्तक झाल्याशिवाय जाऊ शकणार नाही, असा हल्लाबोल ठाकरे यांनी केला. 

उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरूवात...जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि मातांनो...आपल्या सर्वांना विजयदशमीच्या शुभेच्छा!         आतापर्यंत अनेक मेळावे खुप झाले पण हा मेळावा अभूतपुर्व आहे. अनेक मुददे आहेत. मी आज खरच भारावून गेलो. मला माहित नाही की, किती बोलेन....

उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरूवात; ठाकरी तोफेच्या निशाण्यावर कोण?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व्यासपीठावर येताच..शिवसैनिकांचा केला जल्लोष... 

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल करायला सुरूवात केली आहे.  मी सत्तार आणि आणखी काही बंडखोराच्या मतदारसंघात जाऊन त्यांचा समाचार घेणारच आहे. मात्र हिंदूत्वाची भाषा करणारे नारायण राणे हिंदूत्वाबद्दल बोलायला आपल्याला शोभत नाही. तुम्ही तर बोलूच नका. याबरोबरच त्यांच्या दोन मुलाबद्दल तर बोलायचचं नाही, अशा शब्दात त्यांनी शिंदे गटावर जोरदार शब्दाचे बाण सोडले...तसेच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे.  

तेजस ठाकरे व्यासपीठावर न बसता बसले शिवसैनिकांमध्ये...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा ताफा 'शिवतीर्था'च्या दिशेने रवाना...                                                                                                                   शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे  'शिवतीर्था'वर पोचले आहेत. यावेळी त्याच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच तेजस ठाकरे हे उपस्थित आहेत. उद्धव ठाकरे यांनी  'शिवतीर्था'वर आल्यावर प्रथम शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांना अभिवादन केलं आहे.  

शिंदे-फडणवीस सरकार हे काळ्या पायाचं सरकार आहे...                                                                                                                           अंबादास दानवे यांच 'शिवतीर्था'वर  भाषण सुरू                                  कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी चांगल काम केलं. हे सरकार काळ्या पायाचं सरकार आहे. अतिवृष्टीची मदत अद्यापही या सरकारने केली नाही. प्रोत्साहन भत्ताही अद्याप करण्यात आली नाही. 

तेव्हा दिडशे पोलीस माझ्या पाठीमागे लागले होते...                                                                                                                                                    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड केलं तेव्हा त्यांच्यासोबत  सेनेचे आमदार नितीन देशमुख देखील त्यांच्यासोबत त्यावेळी त्यांच्यासोबत काय घडलं हे देशमुख 'शिवतीर्था'वर  होत असलेल्या भाषणात सांगत आहेत.  

'शिवतीर्था'वर  बाळापुरचे आमदार नितीन देशमुखांच भाषण सुरू                                                                                                                            बंडावेळची आठवणं आणि काय घडलं याबाबत देशमुख आपल्या भाषणात सांगत आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार गजानन किर्तीकर हे शिंदे गटात जातील, अशी चर्चा होती. मात्र, ते आता नुकतेच  'शिवतीर्था'वर आगमन झाल आहे. यावेळी त्यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मी शिंदे आणि शिवसेनेमध्ये समेट कसे घडेल यासाठी प्रयत्न करेन. मी असा शांत बसणार नाही. आमच्या सारथख्या वयोवृद्दांचं ते काम आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.   

राज्यात आज काही मेळावे होत आहेत. त्यात पंकजा मुंडेंचा भगवान भक्तीगडावर पार पडला त्यानंतर 'शिवतीर्था'वर शिवसेनेचा मेळावा पार होत आहे. आणि काही लोकांचा लोकांना पैसे देऊन लोकांना आणून मेळावा केला जात आहे, अशा शब्दात त्यांनी शिंदे गटाच्या बीकेसीच्या मेळाव्यावर टीका केली आहे.  

'शिवतीर्था'वर दसरा मेळाव्याच्या भाषणांना सुरूवात झाली आहे. शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या भाषणास सुरूवात झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. यामुळे दोन्ही गटाकडून आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला जात आहे. अशीच चुरस शिवसेनेच्या परंपरागत असलेल्या दसरा मेळाव्यावरूनही निर्माण झाली असून शिवसेना आणि शिंदे गट दोघांचे दोन मिळाले आज मुंबईत होत आहेत. उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्क मैदानावर अर्थात 'शिवतीर्था'वर मेळावा होत आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बीकेसीच्या मैदानावर मेळावा होत आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे ठिकाणी म्हणजे शिवतीर्थवर शिवसैनिकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.