शिवसैनिकांनो लाचार संजय राऊतांना आताच आवरा...गजानन काळे

भविष्यात मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत CM Race राष्ट्रवादीला NCP शिवसेनेचा Shivsena मुख्यमंत्री CM नको आहे, असे चित्र सध्यातरी महाराष्ट्रात Maharashtra दिसत आहे.
Manse Gajanan Kale
Manse Gajanan Kalesarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी शिवसेनेच्या आमदार, खासदारांची तसेच शिवसैनिकांची कोंडी करतंय त्याबद्दल उघड नाराजी बोलून दाखवली जात आहे. भविष्यात सुप्रिया सुळे या पहिल्या महिला मुख्यमंत्री व संजय राऊत राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री होता काय हेच चित्र शिवसैनिकांना पहायचे बाकी आहे. शिवसैनिकांनो काळजी घ्या, या लाचार संजय राऊतांना योग्य वेळी आवरा, असा सल्ला मनसेचे नवीमुंबईचे प्रवक्ते गजानन काळे यांनी दिला आहे.

यासंदर्भात मनसेचे गजानन काळे यांनी व्टीटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री पदावरून राष्ट्रवादी व शिवसेनेत सुरू असलेली रस्सीखेचीवर रस्सीखेचीवर भाष्य केले आहे. यामध्ये त्यांनी शिवसैनिकांना काही सल्लाही दिला आहे. गजानन काळे यांनी म्हटले की, विश्व प्रवक्ते संजय राऊत म्हणतात, पुढील २५ वर्षे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल. तर, सुप्रिया सुळेंनी तुळजाभवानीला साकडे घालत पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ देत, मी नवस फेडण्यास येईन, असे सांगत आहेत.

Manse Gajanan Kale
मनसे आमदाराने घेतली खासदार संभाजीराजेंची बाजू : ट्विट करत म्हंटले की...

शिवसेनेचे गजानन किर्तीकर, खासदार संजय जाधव, श्रीकांत शिंदे किंवा इतर सर्व नेते असतील, ज्या पध्दतीने राष्ट्रवादी शिवसेनेच्या आमदार, खासदारांची तसेच शिवसैनिकांची कोंडी करतंय, त्याबद्दल उघड नाराजी बोलून दाखवली जात आहे. ज्या विश्व प्रवकत्यांना मनसेच्या कोंडीची काळजी आहे, त्या संजय राऊतांना शिवसेनेची कोंडी राष्ट्रवादीच्या माध्यमातून होतंय ते पहावत नाही की काय.

Manse Gajanan Kale
Video: ओवेसी बोकडांनी महाराष्ट्रात येऊन बडबड करू नये; गजानन काळे

भविष्यात मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत राष्ट्रवादीला शिवसेनेचा मुख्यमंत्री नको आहे, असे चित्र सध्यातरी महाराष्ट्रात दिसत आहे. पुढच्या काही दिवसांत सुप्रिया सुळेंना महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व संजय राऊत राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री होतात काय ऐवढेच चित्र शिवसैनिकांना पहायचे बाकी आहे. शिवसैनिकांनो काळजी घ्या, या लाचार संजय राऊतांना योग्य वेळी आवरा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com