'शिवसेनेला दहा हत्तीचे बळ; वाघ बाहेर पडलाय, शिंदे-फडणवीस सावध रहा!'

Sanjay Raut Bail News : संजय राऊत यांना जामिन मिळाल्याचे जाहीर होताच न्यायालयापासून राज्याच्या कानाकोपऱ्यात एकच जल्लोष सुरु झाला आहे.
Sanjay Raut Bail News
Sanjay Raut Bail News sarkarnama

Sanjay Raut Bail News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shiv Sena) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना 100 दिवसांनी पत्राचाळ प्रकरणात विशेष पीएमएलए न्यायालयाकडून (Court) जामीन मंजूर झाला आहे. जामिन मिळाल्याचे जाहीर होताच न्यायालयापासून राज्याच्या कानाकोपऱ्यात एकच जल्लोष सुरु झाला आहे.

शिवसैनिकांच्या वतीने जोरदार घोषणा देण्यात येत आहेत. टायगर इज बॅक, शिवसेनेचा ढाण्या वाघ बाहेर येणार, अशा प्रतिक्रिया उमटत आहे. राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर कोल्हापूरमध्येही शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिवसेनेते कार्यकर्ते उपस्थित होते.

Sanjay Raut Bail News
ईडीवर न्यायालयाचे ताशेरे; संजय राऊतांची अटकच बेकायदेशीर

या वेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. देशात सुडाचे राजकारण सुरु असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. विजय देवणे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता सावध रहावे, असा इशारा दिला. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तुम्हाला सळो की पळो करून सोडले आहे. आता वाघ तुम्हाला सोडणार नाही, असेही शिवसैनिकांनी सांगितले. तर मुरलीधर जाधव यांनी जाणीवपूर्वक कारवाई करण्यात आल्याचा आरोप केला.

संजय पवार म्हणाले, राऊत यांच्यावर हेतूपरस्पर कारवाई करण्यात आली. जे देशभरात घडत आहे ते महाराष्ट्रात घडत असल्याचेही ते म्हणाले. आमच्याविरोधात बोलायचे नाही, तो नियम कुठून काढला? हा हुकूमशाहीला धक्का आहे. न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला, असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, विशेष न्यायालयाने संजय राऊत यांना जामीन मंजूर केल्यानंतर ईडीने उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, उच्च न्यायालयाने ईडीला फटकारले. मुंबई उच्च न्यायालयात तातडीने या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला. तसेच कार्यालयीन प्रक्रियेच्या विरोधात जाऊन सुनावनी करू शकत नाही, असेही सांगितले. उदया सकाळी या जामीना संदर्भात सुनावनी करु, असेही न्यायालयाने सांगितले.

Sanjay Raut Bail News
शिवसेनेचा ढाण्या वाघ बाहेर..फटाक्यांची आतषबाजी अन् घोषणांनी राऊतांचं स्वागत...

सत्र न्यायालायने महिनाभर ऐकून निर्णय दिला आहे. त्यावर १० मिनिटात निर्णय देण योग्य नाही, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच तुम्ही गुणवत्तेच्या आधारावर युक्तीवाद करा. एका दिवसाने काय होणार आहे, अशा सवाल उच्च न्यायालयाने ईडीला केला. या प्रकरमाणुळे पुन्हा एकादा राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com