Shivsena| भाजपच्या लोकांचे पाय.. ;शिवसेनेनं बंडखोर आमदारांना डिवचलं...

Shivsena| दसरा मेळावा कुठे होणार यावरुन शिंदे गट आणि शिवसेनेत सध्या शाब्दिक चकमकी सुरु आहेत.
Shivsena|  भाजपच्या लोकांचे पाय.. ;शिवसेनेनं बंडखोर आमदारांना डिवचलं...

सिंधुदुर्ग : दीपक केसरकरांना सकाळी बोललेलं संध्याकाळी त्यांना आठवत नाही, त्यामुळे त्यांनी आमची चिंता करू नये. भाजपच्या लोकांचे पाय चेपून मिळवलेलं मंत्रिपद पहिल्यांदा सांभाळावं, अशा शब्दांत शिवसेना (Shivsena) खासदार विनायक राऊत यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधला आहे. दसरा मेळावा कुठे होणार यावरुन शिंदे गट आणि शिवसेनेत सध्या शाब्दिक चकमकी सुरु आहेत. असे असताना खासदार राऊत यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे.

बंडखोर आमदारांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची चिंता करू नये. दसरा मेळावा घेण्याचा अधिकार फक्त उद्धव ठाकरे यांना आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी मिळणारच आणि तो शिवतिर्थावरच होईल, असा पलटवार विनायक राऊतांनी केला आहे. याचवेळी त्यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणि मंत्री उदय सामंत यांचाही समाचार घेतला आहे. इतकेच नव्हे तर शिंदे सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचा आरोप विनायक राऊतांनी केला आहे.

Shivsena|  भाजपच्या लोकांचे पाय.. ;शिवसेनेनं बंडखोर आमदारांना डिवचलं...
भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टींनी धमकी दिली : सोलापुरातील डॉक्टरांचा आरोप

अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील शेतपिकांचं मोठं नुकसान झालं. कोकण, मराठवाडा, विदर्भा या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनगी मंत्र्यांनी लक्ष दिले नाही. कृषिमंत्री मेळघाटामध्ये गेले, पण तरी त्याचा काही फायदा नाही. इतक्या अतिवृष्टीनंतरही अद्याप याठिकाणी पंचनामे झाले नाहीत. मग त्यांचा दौरा कशासाठी होता? असा सवाल विनायक राऊतांनी केला आहे. भाजपने या सर्व चाळीस आमदारांना मंत्रिपदाचे गाजर दाखवले. त्यामुळे यापुढे मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही. जर तो झाला तर हे चाळीसही आमदार एकामेकांच्या उरावर बसतील, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

मुंबईमध्ये भाजपने हिंदुत्वाचे जे बॅनर लावलेत ही भाजपची नौटंकी आहे. पण कोरोना महामारी काळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्बंध लावून लोकांचे प्राण वाचवले. त्यामुळे आता भाजपने हे हिंदुत्वाचे बेगडी जनतेला दाखवून नये, असा आहे इशारा राऊतांनी दिला आहे. मंत्री उदय सामंत यांनीही आम्हाला आव्हान देण्याचा प्रयत्न करू नये. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची पुण्यात सभा झाली तेव्हा तिथे येण्याची उर्मी उदय सामंताना झाली होती आणि त्याच्यातूनच तो सगळा प्रकार घडला. त्यामुळे आता उगीच सामतांनी नाटकं करुन शिवसेनेला आव्हान देऊ नये. सेनेला आव्हान द्याल तर त्याचे काय परिणाम होतील हे तुम्हाला चांगलचं माहिती झालं आहे, असा इशारा विनायक राऊत यांनी मंत्री सामंत यानना दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com