शिंदे समर्थकांचा ठाकरे समर्थकांना टोला : शाखा माझ्या बापाची म्हणून हक्क सांगू नये

ठाकरे समर्थकांनी शाखा आमच्या बापाची प्रॉपर्टी आहे, असे खोचक विधान केले होते.
Shinde supporters
Shinde supportersSarkarnama

डोंबिवली - एखादी शाखा माझ्या बापाची प्रॉपर्टी आहे म्हणून त्याच्यावर कोणी हक्क सांगू नये. ती शिवसेनेची प्रॉपर्टी आहे आणि ती शिवसेनेचीच राहणार असे विधान शिंदे समर्थक कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी डोंबिवली येथे केले. दुपारी शिवसेनेच्या डोंबिवली मध्यवर्ती शाखेत शिंदे समर्थक व ठाकरे समर्थकांत राडेबाजी झाली. यावेळी ठाकरे समर्थकांनी शाखा आमच्या बापाची प्रॉपर्टी आहे, असे खोचक विधान केले होते. यावर लांडगे यांनी ठाकरे समर्थकांना हा टोला लगावला. ( Shinde supporters warn Thackeray supporters: Branch should not claim as my father's )

डोंबिवलीत शिवसेनेतील शिंदे व ठाकरे समर्थक यांच्यातील राजकीय वाद चिघळत चालला आहे. मंगळवारी दुपारी शिंदे समर्थकांनी शिवसेनेच्या डोंबिवली मध्यवर्ती शाखेत घुसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे फोटो लावले. यावेळी शिंदे व ठाकरे समर्थकांमध्ये राडेबाजी झाली. त्यानंतर सायंकाळी शिंदे समर्थक गटाच्या वतीने सभासद नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिंदे गटाने शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याचे पहायला मिळाले.

Shinde supporters
वसई विरार महानगरपालिका निवडणुकीत सर्व पक्षांचा एकला चलो'चा नारा

भगवे झेंडे व बॅनर शहरभर लावण्यात आले होते. शाखे शाखेतून सभासदांची नोंदणी कार्यकर्त्यांनी करून घेतली असून मंगळवारच्या नोंदणी कार्यक्रमाला देखील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, राजेश कदम,

डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, युवा सेना जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे, विश्वनाथ राणे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्याना मार्गदर्शन उपस्थितांनी केले. 5 हजार फॉर्मचे यावेळी वाटप शिंदे गटाकडून करण्यात आले.

Shinde supporters
Dombivali : शिवसेना विरुद्ध शिंदे समर्थक भिडले, ठाकरेंशेजारी शिंदेंचा फोटो लागलाच!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे सदस्य नोंदणी चा शुभारंभ डोंबिवलीत करण्यात आल्याची माहिती यावेळी कल्याण जिल्हा प्रमुख लांडगे यांनी दिली. एकूण 30 हजार सभासद नोंदणीचे उद्दिष्ट असून हे पुढील 3 दिवसांत आम्ही पूर्ण करू. कल्याण डोंबिवली मधून नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे देखील ते म्हणाले.

दुपारी शिंदे समर्थक गट व ठाकरे समर्थक गटात शिंदे यांचे फोटो लावण्यावरून शिवसेना शाखेत वादावादी झाली. याविषयी लांडगे यांना विचारले असता ते म्हणाले, या संपूर्ण प्रकरणाची आम्ही माहिती घेऊ. परंतु कोणत्याही प्रकारची जोर जबरदस्ती करण्यात आलेली नाही. एखादी शाखा माझ्या बापाची प्रॉपर्टी आहे म्हणून त्याच्यावर कोणी हक्क सांगू नये. ती शिवसेनेची प्रॉपर्टी आहे आणि ती शिवसेनेचीच राहणार असे लांडगे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com