शिंदे गटाचे ठाकरे गटाला ओपन चॅलेंज; म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढा...

Dada Bhuse : शिंदे गटाचा ज्या मैदानावर मेळावा होईल तो भव्य दिव्य होईल.
Dada Bhuse News, Shivsena news
Dada Bhuse News, Shivsena newsSarkarnama

डोंबिवली : तुम्ही जर आमच्या बापापर्यंत जात असाल तर आमचे म्हणणे आहे की, आमच्या हिंदुस्थानचा जो बाप आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो तुम्ही काढा मग जनता जनार्दन योग्य निर्णय घेईल. निवडणूका आल्या की, त्यांचे नाव वापरायचे, त्यांचे फोटो वापरायचे आणि निवडणूक संपली की महाराजांना विसरून जायचे, असे प्रतिउत्तर बंदरे आणि खनीकर्म मंत्री दादासाहेब भुसे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर बाप चोरणारी टोळी, असा आरोप केला आहे. त्याला मंत्री भुसे यांनी आपल्या भाषणातून उत्तर दिले. (Dada Bhuse News, Shivsena news)

Dada Bhuse News, Shivsena news
केसरकर सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार तर गायकवाड म्हणतात,ही तर आमचीच इच्छा

शिंदे गटाच्या वतीने कल्याण ग्रामीण परिसरात शुक्रवारी शिवसेनेची संपर्क यात्रा हिंदुगर्वगर्जनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे,आमदार विश्वनाथ भोईर, बालाजी किणीकर,राजेश मोरे, दीपेश म्हात्रे, सुनील चौधरी, महेश गायकवाड यांसह अनेक पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.

कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना मंत्री दादासाहेब भुसे यांनी ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री शिंदे व शिंदे गट समर्थकांवर सातत्याने गद्दार, खोके घेतले अशी टीका केली जात आहे. तसेच बाप चोरणारी टोळी असा उल्लेख शिंदे गटाचा केला आहे. त्यावर भाषणात भुसे म्हणाले, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कोणा एका कुटुंबाचे बाप नव्हते तर ते समस्त शिवसैनिकांचे बाप होते. ग्रामपंचायत निवडणूका होतात त्याठिकाणी शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराजांचे, शिवसेना प्रमुखांचे नाव घेऊन सामोरे जात असतो. मग तुम्ही आमचा बाप काढून जे असे बोलतात त्यांचे विचार फार संकुचित आहेत असे मला वाटते.

सतत गद्दार असे बोलले जाते, मात्र 55 आमदारा पैकी 40 आमदार जेव्हा एखादी भूमिका घेतात तेव्हा काही तरी असेल त्यापाठी काही तरी असेल ना, अशी भावना पोट तिडकीने त्यांनी मांडली.

Dada Bhuse News, Shivsena news
अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावर स्पष्टीकरणं म्हणाले,..मी गंमतीनं म्हणालो...

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तर यापूर्वी एनडीआरएफच्या निरीक्षण प्रमाणे मदत दिली जायची. मुख्यमंत्री शिंदे व भाजपा सरकारने एनडीआरएफपेक्षा दुप्पट दराने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 6 हजार 800 प्रति हेक्टर मदत मिळायची ती आता 13 हजार 500 रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे. पूर्वी 2 हेक्टर पर्यंत ही मदत मर्यादित होती ती आता 3 हेक्टर पर्यंत दिली जाणार आहे. 65 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला तर मदत दिली जायची, आता सलग दोन तीन दिवस पाऊस पडला तर ही मदत दिली जाणार आहे असे ते म्हणाले.

Dada Bhuse News, Shivsena news
अजितदादांच्या मनात चाललंय, तरी काय?

आजच्या मेळावा फक्त ट्रेलर आहे. यामुळे दसरा मेळाव्याला आता कोणतं मैदान शोधायचा याचा विचार करायला लागेल असे ते म्हणाले. न्यायालयाच्या निर्णयावर ते म्हणाले, न्यायालाचा निर्णय आपण स्वीकारत असतो. माझं व्यक्तीगत मत आहे की, आपण सांगताय त्याप्रमाणे निर्णय झालेला असेल तर छत्रपती शिवाजी पार्क हे जे मैदान आहे. त्याच्यापेक्षा बीकेसी हे मोठे मैदान आहे. आणि आता आपला शिवसेनेचा मेळावा कदाचित या मैदानावर अपुरा पडला असता. शिवसैनिक आपल्या आपल्या पद्धतीने काम करत असतात. आता शिंदे साहेब जो काही निर्णय घेतील, ज्या मैदानावर मेळावा होईल तो भव्य दिव्य होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com