शिंदे गटाची नवी चाल; सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल

Eknath Shinde| Uddhav Thackeray| केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यानंतर आता शिंदे गटाच्या हालचाली वाढल्या आहेत.
Uddhav Thackeray News, CM Eknath Shinde News, Supreme Court News
Uddhav Thackeray News, CM Eknath Shinde News, Supreme Court NewsSarkarnama

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणी शिंदे गटाने नवा डाव टाकला आहे. शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court) रिट याचिका दाखल करत केंद्रीय निवडणूक आयोगाची सुनावणी सुरूच ठेवण्याची मागणी केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यानंतर आता शिंदे गटाच्या हालचाली वाढल्या आहेत. शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करत केंद्रीय निवडणूक आयोगाची सुनावणी सुरू ठेवावी, निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देऊ नये, अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे. तसेच, न्यायलयाने त्वरीत सुनावणी घ्यावी आणि निवडणूक आयोग प्रक्रीयेसंदर्भात निर्णय द्यावा, अशीही विनंती या याचिकेत करण्यात आली आहे. आज शिंदे गटाच्या वतीने वकील न्यायालयात मेन्शनिंग करणार आहेत. दरम्यान आयोगाकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 23 सप्टेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

Uddhav Thackeray News, CM Eknath Shinde News, Supreme Court News
Ambadas Danve: अमित शहांचे मुंबईप्रेम हे बेगडी आहे

शिवसेनेची ओळख असलेला धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मिळवण्यासाठी शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. पण न्यायालयाने आयोगाच्या सुनावणीला स्थगिती दिली होती. तसेच पाच न्यायाधीशांचे खंडपीठही स्थापन करण्यात आले आहे. मात्र महाराष्ट्रातील प्रकरणावर सुनावणी कधी होणार आहे, याबद्दल अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

मुंबईमधील अंधेरी पूर्व भागामध्ये शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे त्यांची विधानसभेतील जागा रिकामी झाली आहे. या जागेसाठी विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. शिवसेनेने रमेश लटके यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे. तर शिंदे गटानेही या जागेसाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिंदे गटाला पक्षचिन्ह कोणते मिळणार असा प्रश्न उपस्थितीत होत आहे. त्यासाठीच शिंदे गटाने आता न्यायलयात धाव घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com