शिंदे गट अंधेरी पोटनिवडणुकीत उमेदवारच देणार नाही; मग चिन्हासाठी घाई का? : शिवसेनेचा आयोगापुढे दावा

अंतिम निर्णय होईपर्यंत चिन्हाचा निर्णय ‘जैसे थे’ ठेवा, अशी मागणीही शिवसेनेने आयोगाकडे केली आहे.
ShivSena
ShivSenaSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांचा गट अंधेरी (Andheri) पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत (by-election) उमेदवारच उतरवणार नाहीत, त्यामुळे ते निवडणूक चिन्ह का मागत आहेत, दावा शिवसेनेकडून (Shivsena) केंद्रीय निवडणूक आयोगापुढे (Election commission) केला आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात अगोदर आमचाच आमदार होता, त्यामुळे अंतिम निर्णय होईपर्यंत चिन्हाचा निर्णय ‘जैसे थे’ ठेवा, अशी मागणीही शिवसेनेने आयोगाकडे केली आहे. (Shinde group will not field candidate in Andheri by-election; So why rush for a sign? : ShivSena)

धनुष्यबाण या चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शिंदे गट आणि शिवसेनेकडून कागदपत्रं सादर करण्यात येत आहेत. शिवसेनेकडून आज निवडणूक आयोगापुढे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या संदर्भाने निवडणूक चिन्हाबाबत दावा केला आहे.

ShivSena
निवडणूक आयोगाचा शिवसेनेला मेल : ‘तुमची माहिती फॉरमॅटमध्ये नाही; पुन्हा पाठवा’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट हा अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत उमेदवार उतरवणार नाहीत. मग ते चिन्हा मागण्याची घाई का करत आहेत, असे म्हणणे शिवसेनेकडून निवडणूक आयोगापुढे मांडण्यात आले आहे. निवडणूक चिन्हाबाबत निर्णय घ्यायला, सध्या आणीबाणीची स्थिती नाही. त्यामुळे निवडणूक चिन्हाबाबत तात्काळ सुनावणी घेण्यात येऊ नये, असे म्हणणे शिवसेनेकडून मांडण्यात आले आहे. तत्काळ निवडणूक घेऊ नये, यासाठी शिवसेनेकडून जी तीन कारणे निवडणूक आयोगासमोर मांडण्यात आली आहेत. त्यापैकी वरील एक आहे.

ShivSena
Silver Oak Attack : ११८ एसटी कामगारांना पुन्हा सेवेत घेण्याच्या सरकारच्या निर्णयावर शरद पवार म्हणाले...

दरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात या अगोदर आमचा म्हणजेच शिवसेनेचा उमेदवार निवडून आला होता. त्यामुळे चिन्हाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवावी, अशी मागणीही शिवसेनेकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. आता निवडणूक आयोग काय निर्णय घेतो, हे पाहणे महत्वाचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com