Sheetal Mhatre Criticized Thackeray : 'तो' धनुष्यबाणही एकनाथ शिंदेंनीच दिलेला होता,हे तरी...? शीतल म्हात्रेंनी ठाकरेंना डिवचलं

Shivsena News : ...म्हणून मिंधे गटाला धनुष्यबाण चिन्ह दिलं!
Uddhav Thackeray - Sheetal Mhatre
Uddhav Thackeray - Sheetal Mhatre Sarkarnama

Sheetal Mhatre On Uddhav Thackeray : केंद्रीय निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांना शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढविला होता.

यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जो धनुष्यबाण देव्हाऱ्यात ठेवून पूजत होते. तो उद्धव ठाकरे यांनी दाखवला होता. आयोगाने कागदी धनुष्यबाण जरी मिंधे गटाला दिला असला तरी बाळासाहेब ठाकरेंच्या पूजेतला धनुष्यबाण आपल्याकडे असल्याचं सांगत शिंदे गटावर टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी उध्दव ठाकरेंना डिवचलं आहे.

आता शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी टि्वटद्वारे उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. म्हात्रे यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देवघरात ठेवलेला धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनीच दिलेला होता... हे तरी लक्षात आहे का? असा सवाल विचारत शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

Uddhav Thackeray - Sheetal Mhatre
Sanjay Raut : ''...नाहीतर रस्त्यावर पवार…पवार ओरडत फिरायची पाळी आपल्यावर येईल!''; मनसेचं राऊतांना पत्र

उध्दव ठाकरे नेमकं काय म्हणाले ?

निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरु असताना पंतप्रधानांनी घोषणा करायला हरकत नाही की ७५ वर्षांचं स्वातंत्र्य संपवून आता देशात बेबंदशाहीला सुरुवात होत आहे अशी संतप्त प्रतिक्रिया उध्दव ठाकरें(Uddhav Thackeray)नी निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर दिली होती.

तसेच बाळासाहेब ठाकरे यांनी देव्हाऱ्यात धनुष्यबाण पुजला. तोच धनुष्यबाण मी आज तुम्हाला दाखवतो. त्याच्यावर कुंकू देखील आहे. शिवसेनाप्रमुखांच्या पुजेतला आणि अजूनही आमच्या देव्हाऱ्यात असलेला धनुष्यबाण असा कुणी हिरावून घेऊ शकत नाही. त्यांचं धनुष्यबाण कुणीही ओरबाडून घेऊ शकत नाही. बाळासाहेबांनी स्वत:च्या हाताने पुजलेला धनुष्यबाण त्याचं तेज या शक्तीला दाखवल्याशिवाय राहणार नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते.

Uddhav Thackeray - Sheetal Mhatre
Chhagan Bhujbal News; एकनाथ शिंदे यांनी आता थांबलेलंच बरं!

यावेळी त्यांनी शिवसैनिकांनो, शेवटपर्यंत लढावंच लागेल, आता माघार नाही. मी खंबीर आहे, तुम्ही फक्त खचू नका. हिंमत सोडू नकाअसा धीरही दिला होता.

...म्हणून मिंधे गटाला धनुष्यबाण चिन्ह दिलं!

केंद्रीय निवडणूक आयोगाने मिंधे गटाला धनुष्यबाण चिन्ह दिलं आहे. याचा अर्थ येत्या दोन महिन्यांत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागू शकते. त्यांना आता मुंबई पालिका जिंकून मुंबईला दिल्लीश्वरांच्या समोर कटोरा घेऊन उभं करायचं आहे. उद्या कदाचित आपले मशाल हे चिन्हदेखील हिसकावून घेतलं जाऊ शकतं. या सगळ्याचा बदला सामान्य जनता घेईल असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in