Politics : ''...त्यांचं तैलचित्र लावताना कशाचं डोंबलाचं राजकारण करता!''; शिंदे गटाच्या नेत्यानं ठाकरेंना सुनावलं

Ramdas Kadam On Uddhav Thackeray : ठाकरेंनी राजकारण बाजूला ठेवत तैलचित्र अनावरण कार्यक्रमाला उपस्थित राहायला पाहिजे होते...
Ramdas Kadam, Uddhav Thackeray
Ramdas Kadam, Uddhav ThackeraySarkarnama

Shinde Group Attack Vs Thackeray group : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विधानभवनातील तैलचित्राच्या अनावरण कार्यक्रमावरुन चांगलंच राजकारण तापलं आहे. उध्दव ठाकरेंचं कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत नाव न टाकल्यामुळे ठाकरे गटाकडून शिंदे फडणवीस यांच्यावर सडकून टीका करताना गलिच्छ राजकारणात करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला होता. आता याच आरोपावर शिंदे गटाकडून जोरदार पलटवार केला आहे.

माजी मंत्री व शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विधीमंडळातील तैलचित्राच्या अनावरण सोहळ्याहून रंगलेल्या राजकारणावर भाष्य करताना उध्दव ठाकरेंवर आगपाखड केली आहे.

कदम म्हणाले,उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मनाचा मोठेपणा दाखवून बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरण कार्यक्रमाला आले असते तर चांगले झाले असते. तैलचित्र आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला तरी ठाकरेंनी राजकारण बाजूला ठेवत या कार्यक्रमाला उपस्थित राहायला पाहिजे होते. कारण हा काही राजकीय कार्यक्रम नव्हता. अशा कार्यक्रमाद्वारेही जर राजकारण करण्यात येत असेल तर चुकीचं आहे असेही रामदास कदम (Ramdas Kadam) म्हणाले.

Ramdas Kadam, Uddhav Thackeray
Narendra Modi : काँग्रेस नेत्याकडून पंतप्रधान मोदींची हुकुमशहा हिटलरशी तुलना; म्हणाले, ''हिटलरही आपल्या...''

प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं आणि इतरांना बदनाम करायचं असेल तर त्याची नोंद महाराष्ट्र घेईल. आपण राजकारणात नव्हता, तेव्हापासून आम्ही बाळासाहेंबांसोबत असल्याचं सांगत ठाकरेंना सुनावलं आहे. याचवेळी वडील म्हणून ज्यांचे नाव लावता त्यांचे तैलचित्र लावताना कशाचे डोंबलाचे राजकारण करता का असा सवालही कदम यांनी ठाकरेंना केला आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी (Ncp) बरोबर जात उद्धवजी तुम्हीदेखील बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी केलीच ना. तु्म्ही ज्याप्रमाणे विचारांशी गद्दारी केली. त्यामुळेच तुमच्यासोबत आता कोणतेही राजकीय पक्ष नाहीत, म्हणून तुम्हांला वंचित बहुजन आघाडीला तुम्हांला बरोबर घ्यावं लागत आहे. त्यामुळेच तुमची अशी अवस्था झाली आहे असा टोलाही लगावला आहे.

Ramdas Kadam, Uddhav Thackeray
Eknath Shinde : "बाळासाहेब देणारे होते, घेणारे नव्हते.." ; शिंदेचा टोला कुणाला?

स्वत:ला काही पाहिजे म्हणून...; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना टोला

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्र अनावरण सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला. शिंदे म्हणाले,बाळासाहेबांनी सत्ता, मुख्यमंत्रीपदासाठी विचारांशी कधी तडजोड केली नाही असा टोमणा उद्धव ठाकरेंना लगावत एकनाथ शिंदे म्हणाले,बाळासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आम्ही काम करतोय. बाळासाहेब हे रिमोट कंट्रोल होते. पण, ते रिमोट कंट्रोल सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी चालवायचे. स्वत:ला काही पाहिजे म्हणून त्यांनी कधी रिमोट कंट्रोल चालवला नाही,” असेही एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in