Political news : जुनी भाषणे अंधारेंची पाठ सोडेनात: शिंदे गटाची अध्यात्मिक सेना म्हणते, अशा निर्बुद्धांकरिता...

'संतांनी रेड्याला शिकवलं पण माणसांना नाही शिकवलं' असं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलं होते.
Thackeray-Shinde Politics
Thackeray-Shinde Politics

Satara News : सातशे बत्तीस वर्षांपूर्वी रेड्याला कळालं संतांच्या मागे गेले पाहिजे, पण आज इतकी वर्ष उलटूनही दोन पायाच्या प्राण्यांना कळत नाही ही शोकांतिका! अशा शब्दांत शिंदे गटाचे अध्यात्मिक सेनेचे अध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांनी ट्विटरवरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टिका केली आहे.

सुषमा अंधारे यांची जुनी भाषणे अद्यापही त्यांचा पिच्छा सोडत नाहीत असे दिसत आहे. 'संतांनी रेड्याला शिकवलं पण माणसांना नाही शिकवलं' या त्यांच्या वक्तव्याचा अक्षय भोसले यांनी समाचार घेतला आहे. अक्षयमहाराज भोसले यांनी ट्विट करत अंधारे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Thackeray-Shinde Politics
Maharashtra Political Crises : पक्षप्रमुख पदाचं काय होणार? अनिल परबांनी दिलं उत्तर

आज पौष अमावास्या. ह्याच तिथीला, सातशे बत्तीस वर्षांपूर्वी एक अत्यंत महत्त्वाची घटना घडली होती. ही घटना आपल्या सर्वांना माहीत आहे, पण याची तिथी मात्र आपण विसरून गेलो आहोत. आजच्याच तिथीला पावन करीत, पैठण येथे पुण्यतोया गोदागंगेच्या तीरी, भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली महाराजांनी 'ज्ञान्या' नावाच्या एका रेड्याच्या मुखातून प्रत्यक्ष वेद वदविले होते.

शेकडो वर्षांपूर्वी रेडायला कळालं कोणाच्या मागे गेले पाहिजे आज इतकं संत साहित्य आपल्याकडे असून सुद्धा काही दोन पायाचे प्राणी मात्र संतांचे चमत्कार वा त्यांनी केलेलं कार्य मात्र विसरत आहेत. अशा निर्बुद्धांकरिता माऊलींकडे एकच प्रार्थना...जे खळांची व्‍यंकटी सांडो | तया सत्कर्मी रती वाढो '' अशा शब्दातं अक्षय महाराज यांनी अंधारे यांच्यावर टिकास्त्र डागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in