LIVE Maharashtra Cabinet Expansion : विखे पाटील पाॅवरफुल्ल : महसूल आणि सहकार खाते

Eknath Shinde मंत्रीमंडळाचा नऊ ऑगस्ट रोजी विस्तार संपन्न
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilParesh Kapase

राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्टार एकदम चमकले असून त्यांच्याकडे आता महसूल आणि सहकार अशी दोन प्रमुख खाती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. आजच्या मंत्रीमंडळ विस्तारात विखे यांनी सर्वात प्रथम शपथ घेतली. तेव्हाच विखे हे या मंत्रीमंडळातील तीन नंबरचे मंंत्री बनणार असल्याचे स्पष्ट झाले. राज्याच्या राजकारणात प्रभावशाली असणारे सहकार खाते विखे पाटलांना मिळाल्यानंतर भाजपच्या दृष्टीने अनेक बदल सहकार क्षेत्रात होणार असल्याचा अंदाज आहे. दुसरीकडे महसूल हे गृहनंतर महत्वाचे खाते मानले जाते. ते पण विखे पाटलांकडे जाणार आहे. त्यामुळे विखे हे पाॅवरफुल्ल मंत्री बनणार असल्याचे आता दिसून येत आहे.

नगरविकास खाते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणार आहे. गृह आणि वित्त हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तर ऊर्जा व वन ही दोन खाती सुधीर मुनगंटिवार यांच्याकडे असतील.

पुढील विस्तार सप्टेंबरमध्ये!

शिंदे-फडणवीस सरकारचा पुढील विस्तार आता पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये होणार असल्याचा अंदाज दिपक केसरकर यांनी व्यक्त केला. आजच्या मंत्रीमंडळ विस्तारात अनेकांची संधी हुकल्याने त्यांना चुचकरण्याचा प्रयत्न या निमित्ताने केसरकर यांनी केला आहे. 

Dipak Kesarkar
Dipak Kesarkar

केसरकर झाले खूष

दिपक केसरकर म्हणाले : माझ्या भागeला बऱ्याच वर्षांनी मंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे माझ्या प्रभागातील लोक खुष झाले आहेत. मी त्यांच्याकडूनच एकनाथ शिंदेंचे आभार मानण्यासाठी इथे आलो आहे. मला कोणतेही खात दिलं तर त्या खात्यामध्ये मला माझी काम करायची इच्छा आहे. खातं महत्त्वाचं नसतं काम करायची इच्छा असणं गरजेचं आहे.महाविकास आघाडीमध्ये जे मंत्री होते त्यांना पहिले या सरकारमध्ये मंत्रीपद मिळावा अशी इच्छा होती त्या अनुषंगाने मंत्रीपद मिळाला आहे त्यामुळे कोणीही नाराज नाही. जे मंत्रीपद मला मिळेल त्या मंत्रीपदाचा कारभार मी चांगल्या पद्धतीने हाताळले.

Eknath Shinde
Eknath Shindesarkarnama

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी वर्षा सज्ज होणार.. 

-मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर अखेर मुख्यमंत्र्यांची पावलं `वर्षा` बंगल्याकडे.

-पुजाऱ्यांकडून वर्षा बंगल्याची पाहणी सुरू

- मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर काही तासातच वर्षा बंगल्यावर पाच ते सहा पुजारी दाखल

-वर्षा बंगल्याची वास्तू कशी आहे? कोणत्या वस्तू कुठे ठेवाव्यात?

-त्याचबरोबर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांनी कधी पहिलं पाऊल टाकावं? याचा मुहूर्त काढणार

Shambhuraj Desai,Abdul Sattar,  Deepak Kesarkar, Sanjay Rathore
Shambhuraj Desai,Abdul Sattar, Deepak Kesarkar, Sanjay RathoreSarkarnama

ते नाव नसतं तर बरं झालं असतं : अजित पवार

एकनाथ शिंदे मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या विस्तारात संजय राठोड यांचा समावेश झाल्याने त्याविषयी विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही काही संशयातील व्यक्ती मंत्रीमंडळात नसत्या तर बरे झाले असते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यावर संबंधित पत्रकाराने कोणाचे नाव तुम्ही घेता आहात, असा प्रश्न विचारल्यावर ते नाव तुला माहीत, असे उत्तर त्यांनी दिले. राठोड यांचे नाव घेण्याचे अजितदादांनी टाळले. इतर मंत्र्यांना देखील संजय राठोड यांच्या नावाबद्दल विचारले असता त्यांनी हा निर्णय मुख्यमंत्र्यांचे असल्याचे सांगत त्यावर भाष्य टाळले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राठोड यांना गेल्या सरकारने क्लिन चीट दिली असल्याचे स्पष्ट केले. तसेच याविषयी कोणाचे काही म्हणणे असेल तर ते ऐकून घेऊ, असेही स्पष्ट केेले.

घोटाळ्यात नाव आल्यानंतर सत्तारांना बढती

abdul Sattar
abdul Sattar

अब्दुल सत्तार यांचे आज सकाळपर्यंत मंत्रिमंडळाच्या यादीत नाव नव्हते. टीईटी घोटाळ्यात नाव आल्यानंतर त्यांचे नाव जवळपास मंत्रिमंडळाच्या यादीतून वगळण्यात आले होते. मात्र सत्तार आक्रमक होताच त्यांचा ऐनवेळी मंत्रिमंडळाच्या यादीत समावेश करण्यात आला. त्यामुळे घोटाळ्यात नाव आल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची बढती मिळाल्याची चर्चा सुरु झाली आहे.

संजय राठोड यांना मंत्रीपद; चित्रा वाघ नाराज

संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यामुळे भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ''पुजा चव्हाण च्या मृत्युला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास. लडेंगे….जितेंगे,'' असे ट्विट करत वाघ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यासोबतच त्यांनी @CMOMaharashtra लाही हे टॅग केले आहे.

तसेच, हेमंत देसाई यांनीही राठोड यांच्या मंत्रीपदावर नाराजी व्यक्त केली आहे. '' ज्या संजय राठोड यांच्यावर देवेंद्रजी, प्रवीण दरेकर, चित्रा वाघ प्रभृतींनी सडकून टीका केली होती आणि त्यांचा ठाकरे सरकारमधून राजीनामा मागितला होता, ते राठोड आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री बनले आहेत. नवनिष्कलंक संजय राठोड आणि संस्कारी पक्षाचा विजय असो,'' असा टोला त्यांनी लगावला आहे.

शिंदे गटाचे आणि जळगावचे आमदार गुलाबराव पाटील यांनी पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीत त्यांच्या सोबत जाणारे गुलाबराव पाटील पहिल्या फळीतील मंत्री होते.

भाजपकडून राधाकृष्ण विखे-पाटील आणि चंद्रकांत पाटील यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. आज शपथ घेणारे सर्व मंत्री कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणार आहे.

भाजपकडून राधाकृष्ण विखे- पाटील यांनी पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली.

भाजप नेत्या माधुरी मिसाळ यांना पुन्हा धक्का बसला आहे. मंत्रिमंडळाच्या यादीत सुरुवातीला त्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र पहिल्या यादीत त्यांचे नाव आले नाही. ही २०१४ ची पुनरावृत्ती मानली जात आहे. २०१४ ला रेखा ठाकूर यांना संधी देण्यात आली होती. त्यामुळे आता पुण्यातून फक्त चंद्रकांत पाटील यांना संधी मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे.

आमदार बच्चु कडू यांचे नाव मंत्रिमंडळाच्या यादीत आलेले नाही. मंत्रिपदासाठी ते आग्रही होते. मात्र साडेदहा पर्यंत तरी यादीत नाव न आल्याने ते नाराज झाले आहेत. त्यामुळे आता ते काय भूमिका घेणार याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे. तर दूसरीकडे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे नाव मंत्रीपदाच्या यादीत आले आहे. यड्रावकर अपक्ष असून त्यांना संधी मिळाली. त्यामुळे आता यावर बच्चु कडू काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अब्दुल सत्तार यांची नाराजी... मंत्रिमंडळ विस्तारात नाव रद्द झाल्याने सत्तार नाराज..

अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्री यांनी भेटीसाठी बोलावले...

नंदनवन इथे पोहोचलेले नेते

संजय राठोड

उदय सामंत

संजय शिरसाट

भरत गोगावले

गुलाबराव पाटील

शिंदे गटातून खालीन नावे निश्चित झाली आहेत.

1 दादा भुसे-

2 गुलाबराव पाटील-

3. संदीपान भुमरे-

4 उदय सामंत

5 शंभूराज देसाई-

6 बच्चू कडू-

भाजपचे 9 आणि शिंदे गटाचे 6 जण मंत्रिमंडळात येतील

शिंदे सरकारमध्ये भाजपकडून नऊ नेत्यांना मंत्रीपदाची शपथ देण्यात येणार आहेत. त्या नऊ नेत्यांना खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीची निमंत्रण दिले. यात १) चंद्रकांतदादा पाटील २) राधाकृष्ण विखे पाटील ३) सुधीर मुनगंटीवार ४) गिरिश महाजन ५) सुरेश खाडे, मिरज ६) अतुल सावे 7)मंगलप्रसाद लोढा 8) रवींद्र चव्हाण आणि विजयकुमार गावित अशी नावे अंतिम झाली आहेत. यात मूळ भाजपचे नसलेले विखे आणि गावित यांच्या नावाचा समावेश आहे. त्यातही गावित यांच्या नावबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. नंदुरबार जिल्ह्यातून जयकुमार रावल किंवा इतरांचा समावेश न होता गावितांना पसंती मिळाली आहे. आदिवासी समाजाचा चेहरा म्हणून गावित यांना संधी मिळाली आहे. त्यांच्या कन्या हिना गावित या खासदार आहेत.  

BJP Leader Ashish Shelar
BJP Leader Ashish Shelar sarkarnama

आशिष शेलार यांना कोण धक्का देतयं?

भाजपचे नेते आशिष शेलार यांच्याबाबत पक्षश्रेष्ठी काय ठरवणार आहेत, याबाबत आता त्यांच्या समर्थकांना धास्ती वाटू लागली आहे. मुंबई शहरातील  प्रभावी नेते म्हणून शेलार यांच्याकडे पाहिले जाते. मात्र त्यांचे नाव पहिल्या विस्तारात नसल्याने शंका व्यक्त होत आहे. त्यांच्याकडे भाजपचे प्रदेशाध्यक्षपद दिल जाणार असल्याची चर्चा आहे. चंद्रकांत पाटील यांचा मंत्रीमंडळातील समावेश पक्का झाल्याने एक व्यक्ती, एक पद या सूत्रानुसार त्यांना प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागेल, अशी चर्चा आहे. हे रिक्त पद मग शेलार यांच्याकडे देण्यात येईल. मात्र या पदाबाबत स्वतः शेलार फारसे उत्सुक नाहीत. दुसरीकडे 2013 पासून हे पद सातत्याने बिगरओबीसी नेत्यांकडे गेले आहे. सुधीर मुनगंटिवार हे अलीकडच्या काळातील शेवटचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. त्यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत पाटील यांनी अध्यक्षपद सांभाळले. फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रदेशाध्यक्षपद हे ओबीसी नेत्यांकडे जाईल, याची चर्चा जास्त आहे. शेलार हे मुंबईतील असल्याने त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद खरेच जाईल का, याची शंका आहे. तसेच सलग तीन मराठा प्रदेशाध्यक्ष होणे, हे पक्षासाठी योग्य राहणार नाही. ओबीसी हा भाजपचा मोठा मतदार आहे. त्यांच्यातील कोणाला तरी प्रदेशाध्यक्षपद दिले जाईल, असे सांगण्यात येत आहे. मग शेलार यांना ते पण मिळणार नाही. मंत्रीपदही नाही आणि प्रदेशाध्यक्ष पदाची नुसतीच चर्चा असे शेलारांबाबत घडते आहे की काय, अशी शंका आहे. अमित शहा यांच्याजवळच्या मानल्या जाणाऱ्या शेलार यांच्या राजकीय वर्चस्वाला कोण धक्का देतयं, याची आता चर्चा सुरू झाली आहे.

Devendra Fadnavis News, Mahesh Landage News, Pune News,
Devendra Fadnavis News, Mahesh Landage News, Pune News, Sarkarnama

महेश लांडगे यांना निरोप नसल्याने धाकधूक

पिंपरी-चिंचवडमधून महेश लांडगे यांचे नाव मंत्री म्हणून सर्वाधिक चर्चेत आहे. मात्र भाजपकडून अजून त्यांना निरोप नसल्याने त्यांच्या समर्थकांचा धाकधूक वाढली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुका पुढील काही महिन्यांत होणार असल्याने येथून लक्ष्मण जगताप किंवा महेश लांडगे यांना संधी मिळणे अपेक्षित आहे. मात्र जगताप हे आजारी असल्याने लांडगे यांनाच हे पद मिळण्याची सर्वाधिक चर्चा आहे. गेले काही दिवस त्यांचे समर्थक मंत्रीपदाच्या सेलिब्रेशनच्या तयारीत आहेत. भाजपमधील इतर ज्येष्ठ नेत्यांना उद्याच्या शपथविधीच्या निरोपासाठी फोन गेले आहेत. मात्र लांडगे यांना अद्याप निरोप मिळालेला नाही. रात्री उशिरापर्यंत तो मिळेल, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांना आहे. पुणे जिल्ह्यातून राहुल कुल यांच्याही नावाची चर्चा आहे. त्यांनाही निरोपाची प्रतिक्षा आहे. पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात जमले नाही तर दुसऱ्यामध्ये तरी समावेश होईल, अशी आशा त्यांच्या समर्थकांना आहे.

अतुल सावे-सुरेश खाडे यांना फोन!

Atul Save-Khade
Atul Save-Khadesarkarnama

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मंत्रीमंडळ विस्तारासाठी उद्या नऊ ऑगस्टचा मुहूर्त ठरला असून भाजपने धक्कातंत्र न अवलंबता अपेक्षित नावांना पहिल्या यादीत स्थान दिले आहे.

आतापर्यंत खालील नेत्यांची नावे खात्रीशीररित्या कळाली आहेत.

१) चंद्रकांतदादा पाटील

२) राधाकृष्ण विखे पाटील

३) सुधीर मुनगंटीवार

४) गिरिश महाजन

५) सुरेश खाडे, मिरज

६) अतुल सावे

7)मंगलप्रसाद लोढा

हे सर्वजण माजी मंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांनी काम पाहिले आहे. अतुल सावे यांचे नाव मात्र अनेकांना अनपेक्षित वाटते आहे. माळी समाजाचा चेहरा म्हणून आणि औरंगाबाद महापालिकेची आगामी निवडणूक लक्षात घेता सावेंना संधी मिळाली आहे. फडणवीस सरकारमध्ये सावे हे राज्यमंत्री होते. ते आता कॅबिनेट मंत्री होणार का, याची उत्सुकता आहे. मिरजचे आमदार सुरेश खाडे हे सामाजिक न्यायमंत्री म्हणून फडणवीसमध्ये कार्यरत होते. सांगलीतून त्यांचे नाव नक्की झाल्याने पडळकर यांची संधी हुकते की काय, याची शक्यता वाढली आहे.

मुंबईतून प्रवीण दरेकर आणि आशिष शेलार यांच्या नावाचा समावेश नसल्याने तो धक्का मानला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com