शिंदे सरकारबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार नाही?

CM Eknath Shinde| Uddhav Thackeray| शिंदे गटावर अपात्रेची कारवाई करण्याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती
Uddhav Thackeray News, CM Eknath Shinde News, Shivsena Latest Marathi News
Uddhav Thackeray News, CM Eknath Shinde News, Shivsena Latest Marathi NewsSarkarnam

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारस्थापनेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) आज (11 जुलै) होणारी सुनावणी टळली आहे. शिवसेनेचे वकील आज सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठापुढे सुनावणीची तारीख निश्चित करण्यासाठी विनंती करणार आहेत. (Maharashta Political Update)

शिवसेनेतून फुटलेल्या शिंदे गटाने राज्यघटनेतील दहाव्या परिशिष्टातील तरतुदीनुसार अन्य पक्षात प्रवेश न केल्याने त्यांना अपात्र ठरवावे आणि त्यांच्या पाठिंब्यावर सत्तेवर आलेले सरकार घटनाबाह्य ठरवावे, या प्रमुख मागण्यां शिवसेनेने आपल्या याचिकेत केल्या होत्या. तर अपात्रतेच्या नोटीशींना आव्हान देणाऱ्या व अजय चौधरींच्या गटनेतेपदी नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिका शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत.(Shivsena Latest Marathi News)

Uddhav Thackeray News, CM Eknath Shinde News, Shivsena Latest Marathi News
संतोष बांगर निघाले सगळ्यांचेच गुरु; बंडखोरी करुनही आमदारकी वाचणार

या सर्व याचिकांवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला यांच्या सुटीकालीन खंडपीठाने ११ जुलै रोजी सुनावणी निश्चित केली होती. आता सर्वोच्च न्यायालयाची सुट्टी संपून नियमित कामकाज सोमवारपासून सुरू होत आहे. सरन्यायाधीश रामण्णा यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठाची कार्यसूची रविवारी (१० जुलै) जाहीर करण्यात आली. त्यात या याचिकांचा सुनावणीसाठी समावेश नाही.

या याचिका इतर कोणत्याही खंडपीठाकडे वर्गही केलेल्या नाहीत. त्यामुळे त्यासंदर्भात सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता नाही. शिवसेनेच्या वकिलांनी सुनावणीची तारीख देण्याची विनंती केल्यास सरन्यायाधीश रामण्णा हे आपल्या पीठापुढे सुनावणी कधी घ्यायची, किंवा अन्य पीठाकडे याचिका वर्ग करायच्या, याचाही निर्णय घेतील,अशी माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in