ठाकरेंच्या तीन निर्णयांना शिंदे सरकारकडून स्थगिती ; नामांतराबाबत नव्यानं निर्णय घेणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आघाडी सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेतला होता.
Eknath Shinde, devendra fadnavis
Eknath Shinde, devendra fadnavis sarkarnama

मुंबई : राज्याच्या सत्तासंघर्षांत महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे सरकार (Eknath Shinde) स्थापन झाले आहे. महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय रद्द करण्याचा किंवा त्या निर्णयांना स्थगिती देण्याचा सपाटाच शिंदे सरकारने लावला आहे. आघाडी सरकारने (thackeray government) मंत्रीमंडळाच्या शेवटच्या बैठकीत घेतलेल्या तीन महत्वाच्या निर्णयांना शिंदे सरकारनं स्थगिती दिली आहे. (Shinde government latest news)

औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दि. बा. पाटील असं नामांतर करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. राज्यपालांनी बहुमत चाचणी सिद्ध करायचं पत्र दिल्यानंतर असा धोरणात्मक आणि लोकप्रिय निर्णय घेता येत नसल्याचा आक्षेप घेतल्यानेच या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आघाडी सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेतला होता. हे तीनही निर्णय शिंदे सरकार पुन्हा नव्याने घेणार आहेत. औरंगाबादच्या नामांतराला एमआयएमचे नेते,खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला आहे. त्यांनी या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. "नामांतराचा घाईत घेतलेला निर्णय चुकला आहे," असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

Eknath Shinde, devendra fadnavis
शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच फडणवीस आज ठाकरेंना भेटणार

"औरंगाबाद शहराची जगभरात ऐतिहासिक ओळख आहे. केवळ हिंदुत्व हा मुद्दा दाखवण्यासाठी आणि बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे कुणाच्याही आजोबांच्या इच्छेसाठी औरंगाबादचे नामांतर होऊ देणार नाही. यासाठी कायदेशीर लढाई उभारली जाईल, गरज पडल्यास रस्त्यावर सुद्धा उतरु," असा इशारा जलील यांनी दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com