Shinde Govenment : पत्रकार वारीसेंच्या कुटुंबियांबाबत सरकारनं घेतला 'हा' निर्णय

Shashikant Warise Death : वारीसे यांचा ६ फेब्रुवारीला अपघात झाला होता.
Shashikant Warishe Murder Case
Shashikant Warishe Murder Casesarkarnama

Shashikant Warise Death : पत्रकार शशीकांत वारीसे यांचा संशयास्‍पद मृत्‍यू झाला आहे.वारीसे हे रिफायनरीला विरोध करणाऱ्यांचा आवाज होते. त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे.आज (रविवारी) वारीसे यांच्या कुंटुबियांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय जाहीर केला आहे.

शशिकांत वारिसे कुटुंबियांना २५ लाखांची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. खासदार संजय राऊत यांनी वारीसे कुटुंबियांना ५० लाखांची मदत करावी, अशी मागणी केली होती. वारीसे यांचा ६ फेब्रुवारीला अपघात झाला होता.

Shashikant Warishe Murder Case
Udayanraje Bhosale : उदयनराजेंनी राज्यकर्त्यांना सुनावलं ; म्हणाले, "कोश्यारींचा राजीनामा घेण्यात .. "

या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर वारीसे यांना कोल्हापूरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता, ७ फेब्रुवारीला त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारचालक पंढरीनाथ आंबेरकरला अटक करण्यात आली आहे.त्याला सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

हा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट ) खासदार विनायक राऊत यांनी काल केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर गंभीर आरोप केला आहे. खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र लिहिले होते. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना केली आहे.

Shashikant Warishe Murder Case
Delhi-Mumbai Expressway : गडकरींच्या video वर आनंद महिंद्रा म्हणाले, "ही जादू ..'

"वारीसे मृत्‍यू प्रकरणात ज्‍या आरोपीला अटक केली आहे. त्‍याचा खरा सूत्रधार कोण आहे याची माहिती गृहमंत्र्यांना, मख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आहे. त्‍या दोषींना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्‍ही शांत बसणार नाही. वारीसेंची हत्‍या पुरोगामी प्रतिमेस कलंक लावणारी आहे. अंगणेवाडीतील भाजपच्या सभेनंतर दुसऱ्या दिवशी वारीसे यांची हत्‍या झाली. हा योगायोग समजावा का? असा प्रश्न राऊतांनी उपस्‍थित केला आहे.

रिफायनरीजवळ सत्‍ताधारी पक्षातील नेत्‍यांनी जमिनी घेतल्‍या आहेत. त्‍यांची नावे आपल्‍याकडे आहेत. ती लवकरच आपण समोर आणणार असल्याचा इशारा राऊतांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com