शिंदे फडणवीस सरकारचा 'क्लिनचिट'चा सिलसिला? शुक्लांपाठोपाठ भाजपच्या 'या' बडया नेत्यालाही क्लिनचिट

Shinde Fadnavis Government : राज्यात सत्तांतर होताच पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना क्लिनचिट
Devendra Fadnavis-Eknath Shinde
Devendra Fadnavis-Eknath ShindeSarkarnama

मुंबई: महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना भाजप नेते मोहित कंबोज यांनी सातत्याने आक्रमक भूमिका घेत हल्लाबोल करण्यात येत होता. तसेच या काळात मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे आणि कंबोज यांच्यातला वाद विकोपाला गेला होता. याचदरम्यान कंबोज यांच्यावर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. याच प्रकरणात मोहित कंबोज यांना मोठा दिलासा मिळाला असून मुंबई पोलिसांनी त्यांना क्लिनचिट दिली आहे. (Mohit Kamboj Latest News)

राज्यात सत्तांतर होताच पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी देवेंद्र फडणवीस यांची, तर दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पोलीस अधिकारी रश्मी शुक्लांना क्लिनचिट दिली व या प्रकरणी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. आता शुक्लांपाठोपाठ भाजप नेते मोहित कंबोज यांना देखील फडणवीसांच्या मुंबई पोलिसांनी क्लिनचिट दिली आहे. यामुळे शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंत राज्यात 'क्लिनचिट'चा सिलसिला पुन्हा सुरु झाल्याची चर्चा होऊ लागली आहे.

Devendra Fadnavis-Eknath Shinde
Disha Salian Case : आदित्य ठाकरेंनी प्रथमच सांगितले ‘त्या’ हॉस्पिटलमध्ये उपस्थित असण्याचे कारण....

भाजप नेते मोहित कंबोज यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडून जूनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात कंबोज यांनी इंडियन ओव्हरसीज बँकेकडून २०११ ते २०१५ दरम्यान ५२ कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. कर्जाची रक्कम ज्या कारणासाठी घेतली होती, त्यासाठी वापरली गेली नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखा अर्थात EOW ने मुंबईत मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यांच्या कंपनीने तब्बल ५२ कोटी रुपयांचं कर्ज बुडवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईची राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.

Devendra Fadnavis-Eknath Shinde
Eknath Shinde group; लोकसभेसाठी गोडसे, बोरस्तेंचे भवितव्य काय असेल?

मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर आर्थिक घोटाळ्यासंबंधीचे आरोप मोहित कंबोज यांच्याकडून देखील केले होते. यामुळे पांडे यांच्या अडचणीत वाढ झाली होती. यानंतर पांडे यांनी पोलीस सेवेतून निवृत्ती घेतली. परंतू त्यानंतर काहीच दिवसांत पांडे यांनी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आली होती. यानंतर ते मागील पाच महिने तुरुंगात होते. पांडे यांची गुरुवारी तिहार जेलमधून सुटका झाली असतानाच कंबोज यांना देखील मुंबई पोलिसांनी क्लिन चिट दिली आहे.

मुंबई पोलिसांनी आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये भाजप नेते मोहित कंबोज यांच्याविरोधात आमच्याकडे सबळ पुरावे नाहीत. त्यामुळे कंबोज यांना क्लीन चिट देत असल्याचं स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आलं आहे. आर्म्स अॅक्टअंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांमधूनही कंबोज यांची सुटका झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com