Shinde Fadnavis Government : शिंदे फडणवीस सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण, खारघरच्या दुर्घटनेनंतर घेतला 'हा' मोठा निर्णय

Minister Mangal Prabhat Lodha : ''विरोधकांचं काम आहे राजीनामा मागणे, पण...''
 Shinde-Fadanvis Government|
Shinde-Fadanvis Government| Sarkarnama

Mumbai : खारघर येथे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने दिला जाणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये लाखो श्री सदस्य सहभागी झाले होते. मात्र, या सोहळ्यात उष्माघातामुळे आत्तापर्यंत चौदा जणांना जीव गमवावा लागला होता.या सोहळ्याच्या आयोजनावरुन विरोधकांकडून शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र शासन आणि श्री सदस्यांच्या समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला होता. परंतू, या कार्यक्रमात उष्माघातामुळे मृत पावलेल्या श्रीसदस्यांची संख्या १४ वर पोहचली आहे. याचवरुन आता राजकारण तापलं आहे. विरोधकांनी यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरु असून संबंधित मंत्रालयाच्या मंत्र्यांची राजीनाम्याची देखील मागणी केली आहे.

 Shinde-Fadanvis Government|
BRS Rally News : मुख्यमंत्री केसीआर यांच्यासमोर शक्तीप्रदर्शन अन् उमेदवारीवर शिक्कामोर्तब ?

शिंदे फडणवीस सरकारकडून यापुढे आता मोकळ्या परिसरात सर्व शासकीय कार्यक्रम हे बारा ते पाच या वेळेत न करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

लोढा म्हणाले, सरकारने जो अध्यादेश काढला आहे तो योग्यच आहे. १२ ते ५ या वेळेत मोकळ्या जागेवर कोणत्याही प्रकारचा सार्वजनिक कार्यक्रम न घेण्याचा निर्णय घेतला आहे. आणि तो योग्यच आहे. परंतू महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात असं काही होईल याची कोणालाही कल्पना नव्हती. तीन- चार दिवस तापमान वाढले होते. त्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचंही लोढा म्हणाले.

 Shinde-Fadanvis Government|
Sanjay Rathod News : संजय राठोड पुन्हा अडचणीत? अन्न व औषध प्रशासन कार्यालयावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींकडून खारघर येथील दुर्घटनेला प्रशासनाचा ढिसाळ कारभार व नियोजन कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच संबंधित मंत्र्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जात आहे. यावर भाष्य करताना लोढा म्हणाले, विरोधकांचे काम आहे राजीनामा मागणे, पण कोणालाही कल्पना नव्हती की, असेल काही होईल. शेड का उभारले नाही, मी यावर बोलू शकत नाही. संबंधित विभागाचे लोक त्यावर बोलू शकतील असं मतही लोढा यांनी यावेळी व्यक्त केले.

 Shinde-Fadanvis Government|
Atique, Ashraf Poster News : अतिक, अश्रफला शहिद ठरवणारे बॅनर झळकले..

अहिल्यादेवींच्या नावानं महिलांसाठी दरबार...

राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या वतीनं अहिल्यादेवी होळकर यांच्या नावे आम्ही महिला दरबार सुरू करत आहोत. यापूर्वी ही आम्ही एक दोन कार्यक्रम घेतले होते. त्यात अनेक तक्रारी पुढे आल्या. सर्व विभागाचे अधिकारी यात उपस्थित राहतील आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील. ज्या समस्येशी संबंधित अधिकारी नसेल ती समस्या नोंदवून घेतली जाईल.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in