Cabinet Expansion: तुर्तास मंत्रिमंडळ विस्तार नाहीच; इच्छुकांना वाटच बघावी लागणार..

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाने शिवसेना पक्षचिन्ह आणि नाव शिंदे गटाला दिल्यापासून शिंदे गटाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
Cabinet Expansion:
Cabinet Expansion:Sarkarnama

Shinde-Fadanvis Cabinet Expansion : राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पुन्हा एकदा लांबणीवर पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी पक्षश्रेष्ठींकडूनच ग्रीन सिग्नल मिळाला नसल्याने यावेळीही मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाची आस लावून बसलेल्या इच्छुकांचीही धाकधूक वाढली आहे.

फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार सांगत होते. त्यातच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाने शिवसेना पक्षचिन्ह आणि नाव शिंदे गटाला दिल्यापासून शिंदे गटाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. असं असलं तरी राज्यातील भाजपकडून (BJP)विस्तारासाठी कोणताही प्रतिसाद मिळत नाहीये. त्यामुळे विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकत नाही, असं राजकीय वर्तुळातील सूत्रांचं म्हणण आहे.

Cabinet Expansion:
Supreme Court Hearing : ठाकरेंविरोधात अविश्वास प्रस्ताव न आणणे हा कटाचा भाग, त्यातूनच बंडखोर गुजरात-आसामला गेले

दुसरीकडे मंत्रीपदाची आस लावून बसलेल्या इच्छुकांचं मात्र टेन्शन वाढलं आहे. कारण सध्या राज्याच्या मंत्रिमंडळात शिंदे गटाचे केवळ नऊ मंत्री आहेत. पण बंडावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदार आणि १० अपक्ष आमदार सत्तेतून बाहेर पडले होते. त्यातील अनेकजणांना मंत्रिपदाचे आश्वासन दिले होते. पण गेल्या सात-आठ महिन्यांपासून मंत्रिमंडळ विस्तार लांबत असल्याने शिंदे गटातील आमदारांची धाकधुक वाढली आहे.

शिंदे गटातील आठ-दहा नव्हे तर तब्बल ३२ जण मंत्रिपदाकडे डोळे लावून बसले आहेत. शिंदे गटातील १४ जणांनी तर मंत्रिपदावर पक्का दावा सांगत आहेत. त्यात अपक्ष आमदारही मंत्रिपदाकडे डोळे लावून बसले आहेत. महाविकास आघाडीमध्ये जे मंत्री होते (उदाहरणार्थ बच्चू कडू) अशा नेत्यांनाही मंत्रिपद द्यावं लागणार आहे. ही सर्व पाहता तुर्तास तरी महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराची कोणतीही निर्णयसूत्रे महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याकडे नाहीत. त्यामुळे दिल्लीतून या संदर्भातील निर्णय आल्याशिवाय मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, असेच दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com