Maharashtra Cabinet : अधिकाऱ्यांना बाहेर काढून शिंदे-फडणविसांनी घेतला मंत्र्यांचा क्लास

Eknath Shinde मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आज पहिलीच कॅबिनेट बैठक
Eknath Shinde-Devendra Fadnavis
Eknath Shinde-Devendra FadnavisSarkarnama

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विस्तारीत मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत आमदारांशी कसे वागावे, यावर मंत्र्यांचा क्लास घेतला. आधीच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री हे आमदारांना भेटत नव्हते, अशी तक्रार शिंदे गटातील आमदारांनी सातत्याने केली होती. त्यानंतर शिंदे आणि फडणवीस यांनी आज याबाबत स्पष्ट सूचना आपल्या मंत्र्यांना दिल्या.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
Sharad Pawar|धनुष्यबाण शिवसेनेचा: शिंदे गटाने वाद वाढवू नये

आज दुपारी मंत्रीमंडळाची बैठक झाली. नेहमीचे कामकाज आटोपल्यानंतर अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले. त्यानंतर हा वर्ग घेण्यात आला. ``सर्व आमदारांना वेळ द्या आणि त्यांच्या समस्या सोडवा चेक करा, हे सूत्र मंत्र्यांच्या मनावर बिंबविण्यात आले. चुका होऊ देऊ नका. एकमेकांना सांभाळून घ्या. आमदारांना भेटा त्यांना मानसन्मान द्या त्यांची काम करा. लोकांची काम प्राधान्याने करा. मागच्या सरकारमध्ये आमदारांना सन्मान मिळत नव्हता. मंत्री भेटत नव्हते या सरकारमध्ये तसे होऊ देऊ नका. काही विषय असेल तर आमच्याकडे या, आपले हे सरकार सर्वांनी मिळून चालवायचे आहे,``अशा स्पष्ट सूचना शिंदे आणि फडणवीस यांनी दिल्या.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
शिंदे गटाचे 22 आमदार शपथविधीला अनुपस्थित... `मातोश्री`चे आहे लक्ष!

यावेळी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी आपले मंत्रिमंडळ हे लोकांच्या हितासाठी आणि अगदी शेवटच्या घटकापर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ पोहचविण्यासाठी प्रयत्न करेल, असे सांगून मंत्र्यांनी आपआपली जबाबदारी गांभिर्यपूर्वक पार पाडावी आणि महाराष्ट्राचा देशात नावलौकिक वाढवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

मुंबई मेट्रो मार्गिका -3 च्या सुधारित प्रस्तावास मान्यता

कुलाबा- वांद्रे- सीप्झ या मुंबई मेट्रो मार्ग-3 प्रकल्पाच्या सुधारित खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या प्रकल्पाचा मूळ खर्च 23 हजार 136 कोटी होता तो आता 33 हजार 405 कोटी 82 लाख रुपयांचा होईल. प्रकल्पाच्या वाढीव खर्चात केंद्र शासनाचा सहभाग मिळण्याकरिता देखील केंद्र शासनास विनंती करण्यात येत आहे.

रत्नागिरी येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि महाविद्यालयास संलग्नित जिल्हा सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करुन ४३० रुग्णखाटांचे जिल्हा रुग्णालय स्थापन करण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
PMC Election : शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी मैदानात...

दोनऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत

गेल्या दोन महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आलेल्या निर्णयानुसार एनडीआरएफ च्या मदतीच्या दुप्पट रक्कम नुकसानग्रस्तांना देण्याचा आणि दोन ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत ही मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com