Ashish Shelar : कालची सभा थु चाट सभा होती

उंदीर मारण्याच्या कामातदेखील पैसे खाणारे हे कसले वाघ
Ashish Shelar
Ashish Shelar Sarkarnama

मुंबई : मुंबई महापालिकेतील सत्तेत शिवसेनेने नाल्यात, गटारात, पेंग्विनमध्ये खाल्ले. इतकेच नव्हे तर दहा हजार उंदीर मारण्यासाठी एक कोटी रूपये खर्च केला. उंदीर मारण्याच्या कामातदेखील पैसे खाणारे हे कसले वाघ आहेत, असा पलटवार भारतीय जनता पार्टीचे नेते अशिष शेलार यांनी आज केला.

Ashish Shelar
‘दामाजी’च्या निवडणुकीत आम्हाला कुणी गृहीत धरू नये : परिचारक समर्थकांचा आमदार आवताडेंना इशारा

शिवसेनेच्या शनिवारी झालेल्या सभेला उत्तर देण्यासाठी मुंबई भाजपाच्यावतीने आज उत्तर भारतीयांची सभा घेण्यात आली. यावेळी शेलार बोलत होते. ते म्हणाले, ‘‘ राहुल भटचे काय झाले, असे विचारणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आधी डॉ. अमरापूरकरचे काय झाले याचे उत्तर द्यावे. कमला मिलला लागलेल्या आगीचे उत्तर द्या.

Ashish Shelar
पुणे-पिंपरीसाठी शिवसेनेचे ‘वाघ’ समन्वयाचे काम पाहणार

आरे कारशेड का नाही झाली, त्याचे उत्तर द्या. काश्‍मीर आणि देशातल्या अन्य प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहेत. माहीमचे ऐतिहासिक दत्त मंदिर पालिकेने तोडण्याचा निर्णय का घेतला उत्तर द्या. महापालिकेने गेल्या पाच वर्षात तीन लाख कोटी रूपयांची कंत्राटे मंजूर केली. त्या कामांचे काय झाले त्याचे उत्तर द्या, असा प्रश्‍न शेलार यांनी केली. औरंगजेबाच्या कबरीवर माथ टेकणाऱ्यावर गुन्हा दाखल होत नाही. उलट हनुमान चाळीसा म्हणणाऱ्यावर गुन्हा दाखल केला जातो हे कोणते सरकार आहे, असा प्रश्‍न शेलार यांनी केला.शिवसेनेचा कारभार मुंबईकरांनी पाहिला आहे. त्यामुळे यापुढच्या काळात मुंबई महापालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता, असेल असा विश्‍वास शेलार यांनी व्यक्त केला.

शिवसेनेच्या पाच वर्षातील भ्रष्टाचाराची पोलखोल करणारे दोनशे कार्यक्रम आम्ही केले. एक-एक गोष्ट बाहेर येऊ लागल्याने शिवसेना विचलित झाली आहे.त्यामुळे सत्तेत असताना विकासकामांवर बोलण्याऐवजी केवळ आरोप करण्यात मुख्यमंत्री धन्यता मानत आहेत. असा पलटवार शेलार यांनी केला.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com