'रामराजे, जयकुमार गोरे यांचा जनतेला वेडे बनवण्याचा व्यवसाय!'

Shekhar Gore : शेखर गोरे यांनी राम राजे आणि जयकुमार गोरे यांच्यावर टीका
Ram Raje, Jayakumar Gore, Shekhar Gore
Ram Raje, Jayakumar Gore, Shekhar Goresarkarnama

Shekhar Gore : सातारा : आम्हाला माण तालुक्याचा विकास करायचा असून म्हसवडला मंजूर एमआयडीसी जर कोणी कोरेगावला नेण्याचा प्रयत्न करत असेल तर तो आम्ही खपवून घेणार नाही. माण तालुक्याच्या अस्मितेसाठी मंत्रालयावर शिवसेनेच्यावतीने मोर्चा काढून दाखवून देऊ, असा इशारा शिवसेनेचे (Shivsena) नेते शेखर गोरे (Shekhar Gore) यांनी दिला.

दरम्यान, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे (Ram Raje) आणि आमदार जयकुमार गोरे हे दोघेही एकाच माळेचे मणी असून लोकांना वेडे बनवण्याचा दोघांचा व्यवसाय आहे, असाही टोला त्यांनी लगावला होता. म्हसवड एमआयडीसी वरून सध्या रामराजे आणि आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांच्यात वाद पेटला आहे. आता या वादात शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांनी उडी घेतली आहे.

Ram Raje, Jayakumar Gore, Shekhar Gore
हिंमत असेल तर…समोर या; दानवेंचा गायकवाडांना इशारा

या संदर्भातील प्रसिद्धी पत्रकात शेखर गोरे यांनी म्हटले की, म्हसवड येथील एमआयडीसीला स्थगिती देवून कोरेगाव भागातच ती उभारण्याचा फलटण, कोरेगाव येथील लोकप्रतिनिधींनी घाट घातला. म्हसवडऐवजी कोरेगाव येथेच एमआयडीसी उभारण्याबाबत मुंबई येथे संबंधित कार्यालयात वरीष्ठ स्तरावर अधिकाऱ्याची बैठक होणार होती. माण तालुक्यातील जनता सोशीक आणि कष्टाळू आहे. जनतेच्या हाताला काम मिळावे, रोजगार मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न राहिलेला आहे.

जयकुमार गोरे आणि रामराजे हे दोघे एकाच माळेचे मणी आहे. एकाने मारल्यागत करायचे आणि दुसऱ्याने रडल्यागत करायचे. या दोघांच्या शाब्दीक नाटयामध्ये माण तालुक्यातील जनता उपाशी मरत आहे. दोघांनाही सर्वसामान्य जनतेच्या सुखदुखाचे काही घेणे देणे नाही. दोघेही सत्तेच्या हव्यासाला हपालेले आहे. हे त्यांच्या चालण्यावागण्यावरुन दिसते. आज माण तालुक्याला चांगले दिवस येवू लागले आहे.

मंजूर असलेल्या एमआयडीसीमुळे उद्या येथील जनतेला रोजगार मिळणार आहे. त्यामुळे तालुक्यातील जनता सुखी होणार आहे. हे या दोघांनाही बघवत नाही, असा टोला त्यांनी लगावला. माण तालुक्याला मंजूर असलेली एमआयडीसी कोरेगावाला नेण्याचा या सरकारचा डाव आहे, असा आरोप त्यांनी केला. सरकार कोणाचे का असेना माणच्या विकासामध्ये कोणी आडवे येत असेल तर सामान्य नागरिकांना सोबत घेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा शेखर गोरे यांनी दिला.

Ram Raje, Jayakumar Gore, Shekhar Gore
'राम शिंदेंनी आधी राजीनामा द्यावा आणि मग रोहित दादांचा राजीनामा मागावा'

जिल्हा बँकेच्या निवडणूकीवेळी अख्खे पॅनेल टाकणार म्हणणारे आमदार जयकुमार गोरे व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोघांनीही अचानक यु टर्न घेत निवडणुकीतून का माघार घेतली. तर रामराजेंना पाठींबा देण्यासाठी हे न समजण्याएवढी जनता दुतखुळी नाही. म्हणजेच तुझे माझे जमेना आणि तुझ्याविना करमेना..अशी गत जयकुमार गोरे आणि रामराजेंची झाली आहे, असाही जोरदार टोला शेखर गोरे यांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com