Sheetal Mhatre Viral Video : शीतल म्हात्रे यांचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याला अटक!

Sheetal Mhatre Viral Video : यापूर्वी ठाकरे गटाचया दोन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती.
Sheetal Mhatre Viral Video :
Sheetal Mhatre Viral Video : Sarkarnama

Sheetal Mhatre Viral Video : शिंदे गट शिवसनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 'मातोश्री'नावाच्या (Matoshree Page) फेसबूकपेजवरुन हा व्हिडोओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओवरुन शिवसैनिक आक्रमक झाले होते.

शीतल म्हात्रे यांनी याप्रकरणी दहिसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलिसांनी ठाकरे गटाच्या दोघांना अटक केली होती. पोलिस इतरांचाही शोध घेत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या रॅलीमधील हा व्हिडिओ आहे. आता या प्रकरणी नवी अपडेट समोर येत आहे.

Sheetal Mhatre Viral Video :
Nilesh Rane News : नीलेश राणेंविरोधात अश्लील ट्विट करणे पडले महागात, सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल!

शीतल म्हात्रेंचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या आता काँग्रेस कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल करणारा काँग्रेस कार्यकर्ता राजेश गुप्ता यांना अटक करण्यात आली आहे. म्हात्रे यांचा मॉर्फ केलला व्हिडीओ व्हायरल केला, असा आरोप करण्यात येत होता. काही वेळा पूर्वीच ठाकरे गटाच्या दोन पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. आता काँग्रेस कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे.

Sheetal Mhatre Viral Video :
Raigad News : खालापुरात शिंदे गटाला धक्का : वरिष्ठ पदाधिकारी १५० सहकाऱ्यांसह शिवसेनेत परतले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com