शरद पवारांचे बैठकांचे सत्र सुरुच, आज संजय राऊतांसोबत खलबत

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये हि बैठक होत आहे.
शरद पवारांचे बैठकांचे सत्र सुरुच, आज संजय राऊतांसोबत खलबत
Sharad Pawar - Sanjay RautSarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे (Sharad Pawar) बैठकांचे सत्र सुरू असल्याचे दिसत आहे. सोमवारी पवारांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत (Anil Parab) बैठक घेतली होती. त्यानंतर आज शरद पवार आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात बैठक होत आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये हि बैठक होत आहे. यावेळी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

खासदार संजय राऊत हे सध्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे विश्वस्त आहेत. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची निवडणूक काही दिवसांपूर्वी पार पडली आहे. या निवडणुकीनंतरची ही पहिलीच बैठक होत आहे. या बैठकीसाठी माजी आमदार विद्या चव्हाण, भालचंद्र मुणगेकर, प्रताप आसबे, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत.

Sharad Pawar - Sanjay Raut
एसटी संपाबाबत शरद पवार चांगला निर्णय घेतील

ऑक्टोबर महिन्यात मुंबई मराठी ग्रंथ संगहालय निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी शरद पवार हे उमेदवार होते. तर विरोधात धनंजय शिंदे होते. या निवडणुकीत ३४ पैकी ३१ जणांनी मतदान केले होते. त्यात शरद पवार यांना २९ मतं, तर धनंजय शिंदे यांना अवघी २ मतं मिळाली होती. तर या निवडणुकीत उपाध्यक्षपदासाठी विद्या चव्हाण, प्रभाकर नारकर, शशी प्रभू, माजी न्यायमूर्ती अरविंद सावंत, प्रभाकर नारकर, अमला नेवाळकर यांचा विजय झाला होता. त्यावेळी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची निवडणूक राजकीय आखाडा बनल्याचा आरोप करण्यात आला होता.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in