Patra Chawl Case : 'पत्राचाळ' सहभागाच्या आरोपावर शरद पवार यांचे स्पष्टीकरण, म्हणाले..

Sharad Pawar : आरोप खोटे ठरल्यास राज्य सरकार काय करणार ? ?
Sharad Pawar
Sharad Pawar sarkarnama

मुंबई : पत्राचाळ प्रकरणामुळे (patra chawl case) शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत सध्या आर्थर रोड जेलमध्ये मुक्कामी आहे. ईडीने त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या सहभाग असल्याचा गंभीर आरोप काल (मंगळवारी) केला आहे.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भातखळकर यांनी पत्र लिहिले आहे. त्याला शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यावेळी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, "पत्राचाळ प्रकरणी तपास यंत्रणेनं चौकशी करावी, चौकशीनंतर आरोप सत्याला धरुन नसेल, तर आरोप करणाऱ्याचे सरकार काय करणार ?, आम्ही चौकशीला जाण्यासाठी तयार आहोत, "

Sharad Pawar
राऊतांच्या अडचणीत वाढ ; 'ठाकरे' सिनेमाची निर्मिती पत्राचाळ घोटाळ्याच्या पैश्यातून ? ; पाटकरांचा आरोप

आव्हाड म्हणाले, "शरद पवारांनी 14 ऑगस्ट 2006 मध्ये मिटींग घेतली होती. देशामधील हाउसिंगबाबतचे सर्व जण या मिटींगला उपस्थित होते. हा प्रकल्प 1988 चा असून तेव्हापासून पत्राचाळीचे टेंडर दारोदारी भटकत राहीले. शरद पवारांना बैठका काही नव्या नाहीत,"

"जेव्हापासून ते राजकारणात आले तेव्हापासून त्यांनी 10-20 हजार बैठका घेतल्या असतील. अनेक प्रकल्पांत त्यांनी मध्यस्थी करून बैठका घेतल्या. सगळे अडकलेले प्रकल्प, कोकण रेल्वेला दिशा देण्याचे काम शरद पवारांनी दिले," असे आव्हाड म्हणाले.

आव्हाड म्हणाले, "शरद पवारांनी मध्यस्थी केली नसती तर महाराष्ट्रात एकही प्रकल्प झाला नसता. त्यांनी गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणी बैठक घेतली यात काही नवल नाही. पत्राचाळ प्रकरणी अनेकांनी बैठका घेतल्या, पवारांनीही बैठक घेतली, पण या बैठकीत त्यांनी कुठलेही आदेश दिले नाहीत, सरकारने निर्णय घ्यावा, असे त्यांनी सांगितले. याबाबत खुशार चौकशी करा,मात्र या प्रक्रियेत पवारांचा काहीही संबध नाही. चौकशी करा पण पराचा कावळा करू नका, "

पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये गुरू आशीष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात यावे, यासाठी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय राऊत यांनी एक बैठक घेतली होती. या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्री सुद्धा उपस्थितीत होते. त्यामुळे मराठी माणसाला बेदखल करण्याच्या या कारस्थानामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीचा आणि संजय राऊत यांचा काय संबंध होता? याची संपूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत करावी, अशी मागणी भातखळकर यांनी फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com