एसटी संप मिटविण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार; अनिल परबांनी घेतली भेट

एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Strike) वाढत्या आत्महत्यांमुळे एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत
एसटी संप मिटविण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार; अनिल परबांनी घेतली भेट

मुंबईः एसटी महामंडळाचे (ST Mahamandal) राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी गेल्या तीन आठवड्यांपासून एसटी कामगारांनी संप पुकारला आहे. राज्य सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत हा संप मागे घेणार नसल्याची भूमिकाही एसटी कामगारांनी घेतली आहे. दिवसेंदिवस हा संप अधिकच चिघळत चालला आहे. या चिघळलेल्या एसटी संपात शिष्टाई करण्यासाठी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुढाकार घेतला आहे.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यासोबत त्यांनी बैठक घेतली. बैठकीदरम्यान कोणत्या विषयांवर चर्चा झाली याबाबत अनिल परब यांनी माध्यामांना माहिती दिली. " एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ आणि भत्ते याबाबत कोणत्या उपययोजना करता येतील, एसटी संप मिटवण्यासंदर्भात कोणते पर्याय आहेत, कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसंबंधीच्या उपाययोजना, सटी संप मिटवण्याबाबत एसटीची आर्थिक परिस्थिती भविष्यातील उपाययोजना, मागण्या यावर चर्चा झाली. तसेच बाकीच्या राज्याचे पगार आपल्या राज्याचे पगार इत्यादी विषयांवर या बैठकीत चर्चा झाल्याचे अनिल परब यांनी सांगितले.

एसटी संप मिटविण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार; अनिल परबांनी घेतली भेट
अमरावती हिंसाचार : शिवसेना जिल्हा व शहरप्रमुखांना अटक

तर एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे न्यायालयाने नेमलेल्या समितीसमोर कोणते मुद्दे मांडायला हवेत यावरही या बैठकीच चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र ही समिती जो अहवाल देईल, त्यानुसार राज्य सरकार पुढील निर्णय घेणार असल्याचे मंत्री परब यांनी सांगितले.

तर, शरद पवार यांनी महामंडळ विलिनीकरणाच्या मागणीवर आपली भूमिका आधीच व्यक्त केली आहे. एसटी महामंडळाचे राज्यसरकारमध्ये विलिनीकरण करणे म्हणजे थेट मालक बदलण्यासारखे आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे, तर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत अनिल परब यांनी या आधी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे आता शरद पवार आणि अनिल परब यांच्यातील बैठकीतून आज काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in