शरद पवार शिर्डीतील राष्ट्रवादीच्या मंथन शिबीराला जाणार?

Sharad Pawar | चार-पाच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आले.
शरद पवार शिर्डीतील राष्ट्रवादीच्या मंथन शिबीराला जाणार?

शिर्डी : शिर्डीत होणाऱ्या राष्ट्रवादीच्या मंथन शिबीरात अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. शरद पवार सध्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना अजूनही डिस्चार्ज देण्यात आलेला नाही. पण रुग्णालयातून सकाळी लवकरच डिस्चार्ज घेऊन ते दुपारी हॅलिकॉप्टरने शिर्डीत दाखल होतील. मुंबईतून हेलिकॉप्टरने दुपारी १२.५० वाजता निघतील आणि १.४० शिर्डीत पोहचतील, अशी माहिती आहे.

चार-पाच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आले. न्यूमोनियाची लागण झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे ते या शिबिराला हजर राहतील की नाही याबाबत साशंकता होती. पण या शिबिराला उपस्थित राहण्याबाबत त्यांनी कार्यकर्त्यांना शब्द दिला होता. हा शब्द पाळण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते शिबिरात सहभागी झाले होते. यावेळी कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

शरद पवार शिर्डीतील राष्ट्रवादीच्या मंथन शिबीराला जाणार?
शिवसेनेतील फुटीला आम्हीच जबाबदार..! आदित्य ठाकरेंनी स्वत: कबुली दिली

यावेळी "आजार, व्याधी, दुःख, त्रास असा कोणताही शब्द त्या व्यक्तीला जनमानसात मिसळण्यापासून विभक्त करू शकत नाही आणि हीच त्या आधारवडाची खरी ओळख असते." अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. पवारांची ही क्षणभरासाठी झालेली भेट संपूर्ण कार्यक्रमाला व पक्षाच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देऊन गेली, असही बोललं जात आहे.

तर, जेव्हा आपल्या राष्ट्रवादीवर जेव्हा टीका होते त्याचा अर्थ असा होतो री आपला पक्ष बलशाली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्षाकडूनच आपली सत्ता धोक्यात येऊ शकत, ही भीती असल्याने सत्ताधारी सातत्याने राष्ट्रवादीवर टीका करत आहे, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in