मुख्यमंत्र्यांच्या एकेरी उल्लेखावरून शरद पवारही चिडले 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरू आहे. त्याचा खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या ‘रोखठोक’मधून समाचार घेतला आहे. याच प्रकरणी एका हिंदी वृत्तवाहिनीवरील चर्चेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख एकेरी भाषेत करण्यात आला होता. त्या प्रकरणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नाराजी व्यक्त करत ‘मग सरकार काय करते,’ असा प्रश्न विचारला असल्याचे राऊत यांनीम्हटले आहे.
Sharad Pawar was also angry over the single mention of the Chief Minister
Sharad Pawar was also angry over the single mention of the Chief Minister

पुणे : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरू आहे. त्याचा खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या ‘रोखठोक’मधून समाचार घेतला आहे. याच प्रकरणी एका हिंदी वृत्तवाहिनीवरील चर्चेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख एकेरी भाषेत करण्यात आला होता. त्या प्रकरणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नाराजी व्यक्त करत ‘मग सरकार काय करते,’ असा प्रश्न विचारला असल्याचे राऊत यांनी ‘रोखठोक’ सदरात म्हटले आहे. 

‘रोखठोक’मध्ये राऊत यांनी म्हटले आहे की ‘सुशांतसिंह राजपूत या अभिनेत्याने आत्महत्या केल्याचे सकृतदर्शनी दिसते. मात्र, हा खून असल्याचे वारंवार सांगितले जात आहे, त्याला कोणताही आधार नाही. अभिनेत्याचा खून झाला आणि त्यात सिनेसृष्टी, राजकीय नेत्यांचे संगनमत आहे, असे ओरडून सांगणे, हा तापलेल्या तव्यावर पोळ्या भाजू इच्छिणाऱ्या वृत्तवाहिन्यांचा प्रचार साफ खोटा आहे. 

‘महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे आणि ते कसेही करून पाडायचे. पडत नाही, असे म्हटल्यावर बदनाम करायचे, असे विरोधकांनी ठरविले आहे. भारतीय जनता पक्षाच्या सर्व प्रकारच्या पाठिंब्यावर उभ्या असलेल्या वृत्तवाहिन्यांतून विरोधकांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात उडी घेतली. एका हिंदी वृत्तवाहिन्याच्या प्रमुखाने चर्चेत गॉसिपिंग केले आणि लोकांच्या मनातील संशय वाढविला.

अर्णब गोस्वामी हे ‘रिपब्लिक’ वृत्तवाहिनीचे प्रमुख. ते राजकीय नेत्यांचा, मुख्यमंत्र्यांचा सरळ एकेरी भाषेत उल्लेख करतात. बदनामकारक भाषा वापरतात. सोनिया गांधी यांच्याबाबत त्यांनी हेच केले आणि आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ऐकरी भाषेत उल्लेख करून आव्हानाची भाषा करताना त्यांना लोकांनी पाहिले,’ असे राऊत ‘रोखठोक’मध्ये म्हणतात. 

राऊत पुढे म्हणतात की, ‘हे सर्व पाहिल्यावर मला शरद पवार यांचा फोन आला. ‘‘एका वृत्तवाहिनीवर उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ऐकरी भाषेत होतोय. हे बरोबर नाही. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री ही फक्त व्यक्ती नसते, तर ती एक संस्था असते.’’ त्यांनी ‘Institute’ असा उल्लेख केला. शेवटी त्यांनी प्रश्न केला, ‘‘मग सरकार काय करते.’’ पवार यांचे मत एका अनुभवी नेत्याचे मत आहे.

एक वृत्तवाहिनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर ऐकरी भाषेत गरळ ओकते आणि ते सहन केले जाते. त्या वृत्तवाहिनीस महाराष्ट्रातील राजकीय पक्ष बळ देतात. सुशांतसिंह हे एक निमित्त आहे. त्यानिमित्ताने सरकार बदनाम करण्याचे कारस्थान सुरू आहे.’ 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com