सन्मानाची वागणूक मिळाली नाही तर महापालिकेत स्वबळावर! पवारांचा इशारा

शरद पवार यांनी शुक्रवारी सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.
Sharad Pawar
Sharad Pawar

सोलापूर : पुढील काही महिन्यांत राज्यात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीसह (NCP) काँग्रेस (Congress) व शिवसेना (ShivSena) हे महाविकास आघाडीतील (MahaVikas Aghadi) तीन पक्ष एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सोलापुरात बोलताना भाष्य केलं आहे. सोलापूर महापालिकेतील भाजपविरोधी पक्षांची एकजूट करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, सन्मानाची वागणूक न मिळाल्यास स्वबळावर लढण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

शरद पवार यांनी शुक्रवारी सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यामध्ये त्यांनी काँग्रेससह शिवसेनेलाही इशारा दिल्याचे बोलले जात आहे. पवार म्हणाले, महापालिकेत भाजपा सोडून इतर पक्षांची एकजूट करण्याचा प्रयत्न आहे. मात्र सन्मानाची वागणूक मिळाली नाही तर महापालिका स्वबळावर लढवून झेंडा फडकवायचा आहे. यामध्ये 50 टक्के जागा महिलांना देण्यात येणार आहेत, असंही पवार यांनी सांगितलं.

Sharad Pawar
राहुल गांधींनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार! पण...

महापालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता आली तर सोलापूरला जुने दिवस दाखवायचे असल्याचे सांगत पवार म्हणाले, 'हिंजवडी, मगरपट्टा येथे आय. टी. सेंटर झाल्यामुळे पुणे शहराचं अर्थकारण बदललं. त्यामुळं जे हिंजवडीला होऊ शकते ते सोलापूरमध्ये का घडू शकत नाही.' दरम्यान, या कार्यक्रमात काँग्रेससह शिवसेना, भाजपा व इतर पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

सरकारी पाहुण्यांची चिंता नाही!

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निकटवर्तीयांच्या घरी आयकर विभागाने (Income Tax) गुरुवारी (ता. 7) छापेमारी केली आहे. शुक्रवारीही ही छापेमारी सुरूच आहे. त्यावर बोलताना शरद पवार यांनी सरकारी पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते, असं वक्तव्य केलं आहे.

Sharad Pawar
आयकर विभागाचे धाडसत्र दुसऱ्या दिवशीही सुरुच

पवार म्हणाले, काल अजित पवारांच्याकडे सरकारी पाहुणे येऊन गेले, पण पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते. निवडणुकीच्या आधीही मला ईडीची नोटीस आली होती. मी ईडीच्या ऑफिसला गेलो आणि नंतर महाराष्ट्राने त्यांना येडी ठरवलं, असं म्हणत पवारांनी भाजपचा उल्लेख न करता टोला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com