गणेशोत्सवानिमित्त पवार - ठाकरे कुटुंबिय एकत्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कुटुंबिय व ठाकरे यांचे कुटुंबिय एकत्र आले होते. पवार कुटुंबियांनी ठाकरे यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणेशाचे दर्शन घेतले
Sharad Pawar at Uddhav Thackeray Residance for Ganpati Festival
Sharad Pawar at Uddhav Thackeray Residance for Ganpati Festival

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कुटुंबिय व ठाकरे यांचे कुटुंबिय एकत्र आले होते. पवार कुटुंबियांनी ठाकरे यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणेशाचे दर्शन घेतले. 

पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करुन या भेटीची माहिती दिली आहे. तसेच भेटीचे फोटोही ट्वीट केले आहे. या प्रसंगी शरद पवार, सौ. प्रतिभाताई पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे सौ. सुळे, सदानंद सुळे, खासदार संजय राऊत यांच्यासह पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, युवा सेनेचे सचीव वरुण सरदेसाई उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com