शरद पवारांची राष्ट्रवादीच्या नेत्यांवर नाराजी; विधान परिषदेला काळजी घेण्याची सूचना!
Sharad Pawarsarkarnama

शरद पवारांची राष्ट्रवादीच्या नेत्यांवर नाराजी; विधान परिषदेला काळजी घेण्याची सूचना!

राज्यसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने अनुभव आला आहे, त्या पार्श्वभूमीवर आगामी विधान परिषद निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी राष्ट्रवादीकडून रणनीती आखली जात आहे.

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत (Rajya sabha Election) महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार संजय पवार यांच्या पराभवाबद्दल ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) बैठकीत नेत्यांवर नाराजी व्यक्त केली. विशेषतः महाविकास आघाडीची काही मते फुटल्याने त्यांनी आगामी विधान परिषद आाणि राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काळजी घेण्याची सूचना राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींना दिल्या आहेत. (Sharad Pawar Upset on NCP leaders)

राज्यसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव, आगामी विधान परिषद आणि राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत रणनीती ठरविण्यासाठी शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची सिल्व्हर ओक येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुनील तटकरे यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते बैठकीस उपस्थित आहेत.

Sharad Pawar
विखे-पवार संघर्ष वैयक्तिक नाही तर तो...

या बैठकीत शिवसेनेच्या संजय पवार यांच्या पराभवाबद्दल नाराजी व्यक्त केली. विशेषतः आघाडीची काही मते भाजपकडे वळल्याने पवारांनी चिंता व्यक्त केली. सर्वपक्षीय नेत्यांनी रणनीती ठरवूनही त्यात अपयश आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यावेळीच महाविकास आघाडीची मतं फुटल्यावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांवर नाराजी व्यक्त करत विधान परिषद आणि राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काळजी घ्या, अशी सूचनाही पवार यांनी केली आहे.

Sharad Pawar
प्रसाद लाड यांच्या संपत्तीत 58 कोटींची घट तरीही सर्वात श्रीमंत उमेदवार

राज्यसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने अनुभव आला आहे, त्या पार्श्वभूमीवर आगामी विधान परिषद निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी राष्ट्रवादीकडून रणनीती आखली जात आहे. पराभावाचे चिंतन करून विधान परिषद निवडणुकीची रणनीती आखण्यात येत आहे. संजय पवार यांच्या पराभवानंतर खासदार संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांवर केलेल्या आरोपाबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in