Sharad Pawar News : पक्ष सोडण्याच्या विचारात असलेल्यांना पवारांनी सांगितला 'कर्नाटक पॅटर्न..'
Mumbai News : नजीक येऊन ठेपलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या आमदारांची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकींच्या अनुषंगाने चर्चा झाली असून, बैठकीच्या मुख्यस्थानी आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांचा मुद्दा राहिला. (Latest Marathi News)
आजच्या बैठकीत शरद पवार यांनी नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक निवडणुक निकालांचे विश्लेषण केले. यावेळी पवारांनी एक मुद्दा प्रकर्षाने मांडला ते म्हणजे, ऐनवेळी काँग्रेस पक्ष (Congress Party) सोडून भाजप मध्ये गेलेल्या, पक्षांतर केलेल्या आमदारांना पराभवाला सामोरे जावे लागले, असे पवार यांनी आजच्या बैठकीत सांगितले.
भाजपने (BJP) धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला, याला जनेतेने स्पष्टपणे नाकारले. आता सरकारमधील आमदार फुटून भाजपमध्ये जातील, अशी परिस्थितीच कर्नाटकात राहिलेली नाही, अशा प्रकारचं स्पष्ट बहुमत काँग्रेस पक्षाला मिळालं. यातून मतदारांचा कौल दिसून येतो, असे शरद पवार यांनी आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितले.
यामुळे पक्ष सोडण्याच्या विचार करणाऱ्या नेत्यांना, त्यांनी अप्रत्यक्षपणे कर्नाटक निवडणूक (Karnataka Election) निकालाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकप्रमाणेच महाराष्ट्र राज्यातील परिस्थितीचा अंदाज दिला. काँग्रेस पक्ष सोडून भाजपात गेलेले किंवा भाजप मदत करणाऱ्या घटकांना जनतेने स्पष्टपणे नाकारले, असे शरद पवारांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.