Sharad pawar News : शरद पवार भर पत्रकार परिषदेत जयंत पाटील, प्रफुल्ल पटेलांना म्हणाले ‘आय एम सॉरी...’

मी तुमच्याशी ही गोष्ट बोललो नाही.
Jayant Patil-Sharad Pawar-Prafull Patel
Jayant Patil-Sharad Pawar-Prafull PatelSarkarnama

मुंबई : खासदार प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाहत ‘आय एम सॉरी, मी तुमच्याशी ही गोष्ट बोललो नाही,’ असे शरद पवार सांगून, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा माझा विचार आहे, ही गोष्ट मी सहजपणे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना सांगितली होती. त्यामुळे त्यांना माझ्या निर्णयासंबंधी अंदाज होता. पण, माझ्या इतर सहकाऱ्यांना काहीही अंदाज नव्हता,’ असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. (Sharad Pawar told Jayant Patil, Prafull Patel in press conference 'I am sorry...')

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी घेतला होता. त्याचा राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला होता. खुद्द प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे सर्वांसमोर रडले होते. अनेकांना भावना अनावर झाल्या होत्या. सर्व नेते हे शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, असा आग्रह करत होते.

Jayant Patil-Sharad Pawar-Prafull Patel
Sharad Pawar On Ajitdada : पत्रकार परिषदेला अजित पवार गैरहजर : शरद पवार म्हणाले....

त्याचदरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भूमिका मात्र काहीशी शरद पवार यांच्या बाजूने होती. पवारसाहेबांचा उत्तराधिकारी त्यांच्या डोळ्यादेखत तयार झाला तर तुम्हाला का नको आहे, रे असा सवालही त्यांनी उपस्थितांना केला होता. तसेच, हा निर्णय पवारसाहेब एक मे रोजीच जाहीर करणार होते. मात्र, महाविकास आघाडीची सभा असल्यामुळे तो दोन मे रोजी जाहीर करण्यात आला, असे विधानही केले होते. त्यावरून पवार यांच्या पत्रकार परिषदेत यासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला पवारांनी अजितदादांशी यांसदर्भात सहज चर्चा झाली होती, असे स्पष्ट केले.

Jayant Patil-Sharad Pawar-Prafull Patel
Sharad Pawar News : 'फडणवीसांची ‘ती’ खेळी शिवसेनेला थोडी उशिराच उमगली; पण त्यांचं खरं टार्गेट राष्ट्रवादीच होती...'

पवार म्हणाले की, मी आज सांगूनच टाकतो. (प्रफुल्ल पटेल Prafull Patel आणि जयंत पाटील यांच्याकडे पाहून) मला माफ करा, ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी अजित पवार यांना मी पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होऊ इच्छित असल्याचे सहज बोललो होतो, त्यामुळे माझ्या निर्णयाचा त्यांना अंदाज होता. मात्र, माझ्या इतर सहकाऱ्यांना याबाबतची कोणतीही माहिती नव्हती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com