गोयल बदली प्रकरणी शरद पवार मुख्यमंत्र्यांशी बोलणार..

आंचल गोयल प्रकरणी राजकीय हस्तक्षेप झाल्याच्या चर्चे नंतर खान यांनी देखील याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
गोयल बदली प्रकरणी शरद पवार मुख्यमंत्र्यांशी बोलणार..
Parbhani Collector return without Charge-Sharad Pawar-Cm Thackeray News

औरंगाबाद ः एखाद्या चांगल्या, प्रामाणिक कर्तव्यनिष्ठ आयएएस अधिकाऱ्याला बदली झाल्यानंतर रूजू न होऊ देणे हा भयंकर प्रकार आहे. एका महिला अधिकाऱ्याच्या बाबतीत असे घटने हे तर त्याहीपेक्षा वाईट म्हणावे लागेल. (Sharad Pawar to speak to CM on Goyal transfer case) सहा दिवस परभणीत पदभार घेण्यासाठी आंचल गोयल या आपल्या लहान बाळासह थांबून होत्या, पण त्यांना पदभार दिला गेला नाही.

आता तर त्यांना मुंबईत परत बोलावण्यात आल्याचे समजते, हा प्रकार अत्यंत संतापजनक आहे, याचा मी निषेध करते. हा सगळा प्रकार मी आमचे नेते शरद पवार यांच्या कानावर घातला आहे. (Ncp Mp Faujiya Khan Parbhani) त्यांनी देखील याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांशी आपण बोलणार असल्याचे सांगितल्याचे राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांनी म्हटले आहे.

जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या आंचल गोयल प्रकरणी राजकीय हस्तक्षेप झाल्याच्या चर्चे नंतर खान यांनी देखील याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. (Ncp Leader Sharad Pawar) फौजिया खान म्हणाल्या, आयएएस असणार्‍या आंचल गोयल यांना परभणीच्या जिल्हाधिकारीपदी रुजू करुन घेण्याऐवजी माघारी पाठविल्याबद्दल आश्चर्य वाटले.

हा गंभीर प्रकार आहे, अशा प्रकारे एखाद्या आयएएस अधिकाऱ्याला रूजू होऊ न देताच माघारी बोलावणे अत्यंत चुकीचे आहे. या संदर्भात आपण दुपारीच संसदेत शरद पवार यांची  भेट घेवून त्यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी देखील याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या संदर्भात आपण स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलू, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील लक्ष घालण्यास सांगितले असल्याचे खान म्हणाल्या. आयएएस असणार्‍या महिला अधिकार्‍यास या पध्दतीने अपमानीत करुन ऐनवेळी रुजू करुन न घेता माघारी पाठविण्याचा हा प्रकार निंदनीय आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंतेचा आणि संतापाचा विषय आहे.

या प्रकरणात आपण लक्ष घालावे व काही पुढार्‍यांनी हेतुतः केलेल्या खटाटोपाचा समाचार घेवून गोयल यांना पुन्हा सन्मानाने जिल्हाधिकारी पदाचा पदभार सुपूर्द करण्याची सूचना करावी, अशी मागणीही आपण शरद पवार यांच्याकडे केली असल्याचे खान यांनी सांगितले. खान यांनी म्हटले.

दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेतली असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधून लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या असल्याचे समजते.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.