Sharad Pawar : शरद पवार 'इन अॅक्शन मोड' ; आज राष्ट्रवादीची महत्त्वाची आढावा बैठक!

Sharad Pawar : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक!
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसेवा शरद पवार आता पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. उपचारानंतर पुन्हा एकदा पक्षाच्या कार्यात सक्रियपणे पवार सहभागी होत आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांचं विचारमंथन होईल. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आज आढावा बैठक घेणार आहेत.

मागील काही दिवसांपासून शरद पवार प्रकृतीच्या कारणामुळे विश्रांती घेत होते. त्यामुळे ते पक्षाच्या बऱ्याचशा बैठकांना उपस्थित राहू शकले नाहीत. बऱ्याच दिवसापासून त्यांचे दौरे ही झाले नव्हते. आता ते पुन्हा पक्षकार्यात सक्रिय होत आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत विचारमंथन केले जाणार आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar : आठ दिवसांनंतर शरद पवार यांना रुग्णालायातून डिस्चार्ज

शरद पवार यांना न्यमोनियाची लागण झाल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 31 ऑक्टोबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीत आता ठिक झाली असून, ते सक्रियपणे पक्षकार्याचा आढावा घेणार आहेत.

Sharad Pawar
Ravikant Tupkar : हिंमत असेल तर अडवाच, जलसमाधी घेणारच : एक हजार शेतकऱ्यांना घेऊन तुपकर मुंबईकडे रवाना

दरम्यान, मागील दिवसात उपचार सुरु असतानाही शिर्डीत झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंथन शिबीरालाही त्यांनी हजेरी लावली होती. शिबिराच्या स्थळी दाखल झाल्यानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनीही घोषणांच्या निनादात त्यांच स्वागत केलं होतं. पवार यांनी पाच मिनिटे कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी पवार यांचं भाषण वाचून दाखवलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in