हर्षवर्धन पाटील यांना शांत झोप लागते...यावर शरद पवार म्हणतात...

भाजपमध्ये मी मस्त अन् निवांत आहे.
हर्षवर्धन पाटील यांना शांत झोप लागते...यावर शरद पवार म्हणतात...
Harshvardhan Patil, Sharad Pawarsarkarnama

मुंबई : भाजपमध्ये मी मस्त अन् निवांत आहे, मला शांत झोप लागते. माझी कोणती चौकशी ही सुरू नाही, असे व्यक्तव्य भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी केले होते. त्यावरुन राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटल्या, त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही भाष्य केले. (Sharad Pawar said on the statement of Harshvardhan Patil)

पवार मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी पवार यांना हर्षवर्धन पाटील यांच्या विधानावर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर पवार म्हणाले, चांगली गोष्ट आहे. अनेक वेळा आपण हे बघतो, ईथे चौकशा सुरु झाल्या की काही लोक तिकडे जातात. सुख वस्तू होतात, सुखाने झोप येते. त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले आहे की भाजप कशा प्रकारे सत्तेचा गैरवापर करत आहे, असा टोला पवार यांनी लगावला. महाविकास आघाडी सरकार पडत नाही म्हणून भाजप ईडी, सीबीआय, एनसीबी या सारख्या संस्थांचा वापर करत आहे का? त्यावर पवार म्हणाले, हे सरकार पाच वर्ष चालणार आहे. सत्ता एकदा आमच्या लोकांनी हातात घेतली की ते सत्ता सोडणार आहेत का, असे ते म्हणाले.

Harshvardhan Patil, Sharad Pawar
खुद्द पवारांचाच वानखेडेंवर हल्ला... त्यांची कोणाशी संगत आहे, याचा संशय येतोय!

पाटील यांच्या वक्तव्यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीट केले आहे. चाकणकर म्हणाल्या ''भाजपमध्ये गेल्यामुळे चौकशी नाही हे सांगून हर्षवर्धन पाटील यांनी आपण भ्रष्ट आहोत हे स्वतःहूनच मान्य केले आहे. भाजपमुळे चौकशी नाही आणि महत्वाचे म्हणजे इंदापुरच्या जनतेने नाकारल्यामुळे तुम्हाला आमदारकी नाही. त्यामुळे आता निवांतच झोप लागणार. असा टोला चाकणकर यांनी लगावला आहे.

Harshvardhan Patil, Sharad Pawar
मावळ घटनेवरुन फडणवीसांना पवारांचे प्रत्युत्तर

दरम्यान, मावळ मध्ये मी भाजपमध्ये प्रवेश केल्याने शांत झोप लागते या वाक्याचा विपर्यास केला गेला असून त्याठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या स्थानिक नेत्यांच्या भाषणातील एका वक्तव्यावर ते उत्तर दिले होते. मात्र, त्याचा विपर्यास केल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.