`कुणाची सभा? ते काय बोलणार, ते काय करणार, याने तुमचे प्रश्न सुटणार आहेत का?`

शाहू-फुले -आंबेडकरांचा विचार हाच ख-या अर्थाने आपल्याला दृष्टी आणि शक्ती देणारा आहे, असेही पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले.
`कुणाची सभा? ते काय बोलणार, ते काय करणार, याने तुमचे प्रश्न सुटणार आहेत का?`
Sharad Pawarsarkarnama

मुंबई : जातीधर्माच्या नावाने पुन्हा एकदा देशाला मागे नेण्याचा प्रयत्न सुरू केला जात आहे. लोकांचा मुलभूत प्रश्न काय आहे? तर तो महागाईचा, अन्नधान्याचा, बेरोजगारीचा आणि सन्मानाने जगण्याचा आहे. या प्रश्नांकडे कुणाचे लक्ष नाही. काही लोक भलत्याच मागण्या करताना दिसत आहेत. त्यामुळे आपण संभ्रमात पडतो. या सगळ्या गोष्टीला उत्तर देण्याची भूमिका घ्यायची असेल तर शाहू-फुले -आंबेडकरांचा विचार हाच ख-या अर्थाने आपल्याला दृष्टी आणि शक्ती देणारा आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विमुक्त जाती, भटक्या जमाती मागासवर्गीय सेलच्यावतीने कृतज्ञता गौरव सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil), अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, सेलचे अध्यक्ष हिरालाल राठोड आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Sharad Pawar
सोलापूर जिल्हा बॅंक चालवायला मी अन्‌ शरद पवारांनी यायचं का? : अजितदादांनी सुनावले

यावेळी पवार यांनी सर्व समाजाला मुख्य प्रश्नापासून बाजूला नेण्याचा प्रयत्न होतो. आज टेलिव्हिजनवर काही दिवस काय बघतोय तर कुणाची सभा आहे? हे करणार ते करणार! हनुमानाच्या नावाने करणार. आणखी कुणाच्या नावाने करणार. या सगळ्या चर्चा. मागण्या याने बेकारीचा, भुकेचा प्रश्न सुटणार आहे का असा टोला पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला. तुमच्यावर पिढ्यानपिढ्या होणारा अन्याय सुटणार आहे का? असा सवाल करतानाच मुळ प्रश्नाला बगल देऊन भलत्याच गोष्टींकडे समाजाला वळवून स्वतः चा स्वार्थ साधत काही घटकांनी निकाल घेतला आणि त्या गोष्टीला प्रसिद्धी मिळते अशी खंत पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेतो म्हणून एका नेत्याने टिका केल्याचेही पवार म्हणाले. मग नावे कुणाची घ्यायची, असा सवाल करत शाहू-फुले आंबेडकरांचे नाव का घेतो याबाबतची माहिती पवार यांनी दिली. आज श्रीलंकेत दंगा सुरू आहे. दुसरीकडे पाकिस्तानमध्ये पंतप्रधानांना जावे लागले. मात्र, हिंदूस्थान एवढा मोठा देश आहे. अनेक भाषा. अनेक जाती आहेत. त्यामुळे हा एकसंघ राहिला याचे कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आहे, असेही पवार म्हणाले.

Sharad Pawar
अनेक सभा घेऊनही निवडणुकीत राज ठाकरेंचे गुणपत्रक कोरेच ; गुलाबराव पाटलांचा टोला

विमुक्त जाती, भटक्या जमाती मागासवर्गीय सेलच्यावतीने २८ मागण्या करण्यात आल्या. त्या मागण्या महत्त्वाच्या आहेत. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे आणि जयंत पाटील यांच्यासमवेत सेलचे अध्यक्ष हिरालाल राठोड उपस्थित राहून बैठक घेऊ असे आश्वासन शरद पवार यांनी यावेळी दिले. पवार यांनी या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संघटना मजबूत हवी आणि या मजबूत संघटनेला हिरालाल राठोडसारखा नेता हवा, असेही पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.