खुद्द पवारांचाच वानखेडेंवर हल्ला... त्यांची कोणाशी संगत आहे, याचा संशय येतोय!
Sharad Pawarsarkarnama

खुद्द पवारांचाच वानखेडेंवर हल्ला... त्यांची कोणाशी संगत आहे, याचा संशय येतोय!

अमलीपदार्थ विरोधी कारवायांसाठी दोन एजन्सी कार्यरत आहेत.

मुंबई : केंद्राच्या यंत्रणा महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना बदनाम करण्याचे काम करत आहेत. त्यात आता NCB ची भर पडली आहे. एनसीबीचे (NCB) अधिकारी समीर वानखेडे हे याआधी विमानतळावर एक्साईज विभागात होते. तिथेही काही कथा त्यांच्या मला ऐकायला मिळाल्या, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले. या एजन्सीचे मिडीया मॅनेजमेंट चांगले आहे, असा टोला त्यांनी लगावला.

Sharad Pawar
मावळ घटनेवरुन फडणवीसांना पवारांचे प्रत्युत्तर

एनसीबीच्या विरोधात थेट शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. पवार यांनी पत्रकार परिषदेत आज बोलताना एनसीबीच्या निवडक कारवायांविषयी भाष्य केले. ते म्हणाले, ''अमलीपदार्थ विरोधी कारवायांसाठी दोन एजन्सी कार्यरत आहेत. एक एनसीबी आणि दुसरी मुंबई पोलिसांची. गेल्या काही वर्षांत एनसीबीने अमली पदार्थांची किती रिकव्हरी केली याची माहिती घेतली तर त्याचे प्रमाण खूप कमी आहे. कुठे पुडी, कुठे काय, कुठे काही ग्रॅम वगैरे, अशा कारवाया त्यांनी केल्या आहेत. याउलट मुंबई पोलिसांनी केलेल्या जप्तीचे प्रमाण हे केंद्राच्या एजन्सीपेक्षा खुप मोठे आहे. त्यामुळे राज्याची एजन्सी प्रामाणिकपणे काम करते आणि केंद्राची मुंबईतील एजन्सी काहीतरी करतो असे सरकारला दाखवण्यासाठी काम करते.

Sharad Pawar
विलास लांडेंची अजितदादांकडं तक्रार अन् पार्थ पवारांचा इशारा

काही लोक पकडले आहेत. कुठेही गुन्हा घडला, तर पोलिस आणि केंद्रीय यंत्रण आधी पंचनामा करतात. अभिनेता शाहरूखखान याचा मुलगा आर्यन याच्यावरील कारवाईचाही त्यांनी उल्लेख केला. या कारवाईसाठी घेण्यात आलेल्या पंचाबद्दल त्यांनी आक्षेप घेतले. या पंचांच्या समोर लिखापढी होत असते. अधिकारी करत असलेली कारवाई योग्य आहे, की नाही याची खात्री वाटावी अशा पद्धतीचे हे पंच असायला हवेत. आर्यन खानच्या केसमध्ये जे कोण गोसावी पंच म्हणून होते, ते गेले काही दिवस फरार आहेत का? काय माहिती नाही. पंच म्हणून ज्यांची निवड केली ती व्यक्ती समोर यायला तयार नाही, याचा अर्थ त्यांची नैतिकता संशयास्पद दिसत आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी अशा व्यक्तीची निवड केली, याचा अर्थ या अधिकाऱ्यांचे संबंध कोणत्या प्रकारच्या लोकांशी आहे, हे त्यातून स्पष्ट होत, असा टोला पवार यांनी लगावला.

Related Stories

No stories found.