Sharad Pawar Reaction On SC : नैतिकता अन् भाजपचा काही संबंध आहे असे वाटत नाही; पवारांच्या भाजपला कानपिचक्या!

Sharad Pawar Reaction On Supreme Court Verdict : उद्धव ठाकरेंनी पेचप्रसंगाला सामोरे जायला हवे होते.
Sharad Pawar Reaction On SC : Sharad Pawar Reaction On Supreme Court Verdict :
Sharad Pawar Reaction On SC : Sharad Pawar Reaction On Supreme Court Verdict : Sarkarnama

Sharad Pawar Reaction On Supreme Court Verdict : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल यांच्या निर्णयावर ताशेरे ओढताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही ठाकरेचं सरकार पूर्वरत केलं असतं. मात्र, त्यांनी बहुमत चाचणीला सामोरे जाण्यापूर्वीच राजीनामा दिल्याने इतर सर्व बाबी गौण ठरतात, त्यामुळेच राज्यात पुन्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे राहणार, हे आता स्पष्ट झाले आहे. या निर्णयावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार य़ांनी भाजपवर जोरदार सुनावले आहे.

Sharad Pawar Reaction On SC : Sharad Pawar Reaction On Supreme Court Verdict :
Ulhas Bapat On Supreme Court's Final Decision : राज्यपालांनी अधिवेशन बोलावलं नसतं; तर उद्धव ठाकरेंनी राजीनामाच दिला नसता !

शरद पवार पत्रकार परिषेदेत म्हणाले, "निकालात एक महत्त्वाची बाब दिसते, विधिमंडळ हे अंतिम नाही. म्हणून राजकीय पक्ष जो आहे. ज्या राजकीय पक्षाच्या सुचनेने लोक निवडणूक लढवतात. त्या राजकीय पक्षाचा आदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. असे सांगितलेलं दिसत आहे. मला वाटतं अद्याप काही निर्णय व्हायचे आहेत."

"विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचा सुपूर्त केला आहे. आमदारांच्या अपात्रेबाबतचा जो मुद्दा आहे, तो एका विशिष्ट काळात त्यांनी याचा निर्णय घ्यावा, अशा प्रकारची अपेक्षा ही सर्वोच्च न्यायालयाची आहे. अध्यक्ष याबाबत अध्यक्ष काय भूमिका घेतात, ते पाहू. आपण अपेक्षा करूया की, लोकशाही संस्थांबाबत यांना किती आस्था आहे," असे पवार म्हणाले.

पवार पुढे म्हणाले, "नैतिकता आणि भाजपचा काही संबंध आहे असे वाटत नाही. राज्यपालांची भूमिका ही चुकीचीच होती. राज्यकर्त्यांबाबत कोर्टाने तीव्र भूमिका मांडली. आता आम्ही तिन्ही पक्ष म्हणून एकत्र काम करू, आमदारांच्या अपात्रतेबद्दलचा निर्णय येणे अद्याप बाकी आहे."

Sharad Pawar Reaction On SC : Sharad Pawar Reaction On Supreme Court Verdict :
Supreme Court's Final Decision : ठाकरेंच्या राजीनाम्याबाबत न्यायालयाने जे सांगितले; तेच पवारांच्या पुस्तकात !

उद्धव ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

"राज्याच्या प्रमुखाला राज्यातील घडामोडींची बित्तंबातमी आवश्यक असते. उद्या काय होऊ शकते याचा अंदाज घेण्याची क्षमता हवी. त्यानुसार आजच काय पावले उचलायला पाहिजेत याचे राजकीय चातुर्य आवश्यक असते. याचा अभाव उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात जाणवला. शिवसेनेतील बंडाळीनंतर निर्माण झालेल्या पेचप्रसंगाला त्यांनी सामोरे जायला हवे होते. मात्र त्यांनी तात्काळ राजीनामा दिला अन् सरकार कोसळले," असे शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com