Sharad Pawar Press Conference : राष्ट्रवादी सोडणाऱ्यांबाबत शरद पवार थेटच बोलले !

Sharad Pawar Live Update : राष्ट्रवादीच्या काही नेते भाजपसोबत जाणार अशी चर्चा घडून येत होती.
Sharad Pawar Press Conference :
Sharad Pawar Press Conference : Sarkarnama

Sharad Pawar Press Conference : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी (ता.२) राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या निर्णयाला राज्यभरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. त्यानंतर अखेर शरद पवार यांनी हा निर्णय मागे घेतला असून, आता शरद पवारच अध्यक्षपदावर कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शरद पवार यांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) कार्यकर्त्यांमध्ये आनंदाच वातावरण आहे. शरद पवारांनी आपला निर्णय मागे घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात मोठा जल्लोष साजरा करत आनंद व्यक्त केला आहे.

Sharad Pawar Press Conference :
Sharad Pawar Withdraw Resignation: शरद पवारांचा राजीनामा मागे अन् राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष

दरम्यान, वाय बी चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांवर शरद पवार यांनी विविध उत्तरे दिली. यावेळी पक्षातील काही नेते दुसऱ्या पक्षासोबत जाणार असल्याच्या चर्चा होत आहे, असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. यावर पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Sharad Pawar Press Conference :
Sharad Pawar Live Update : 'कार्याध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळेंना पक्षातून आग्रह होता, पण त्यांनीच नकार दिला!'

या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, “ मुद्दा असा आहे की, कुणाला जायचंच असेल तर मग तो कोणत्याही राजकीय पक्ष असो, कुणीही कुणाचा मोहताज नाही. त्यामुळे कुणाला थांबवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तर संघटनेत आणखी बळ कसं वाढू शकतं, याकडे अधिक लक्ष दिलं गेलं पाहिजे. हेच मला समजतं. पण अशी गोष्ट आमच्या संघटनेत नाही”, पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com