कर्नाटकच्या राजकारणात राष्ट्रवादी ताकद वाढवणार; पवारांच्या उपस्थितीत आज शक्तिप्रदर्शन

शरद पवार आज कर्नाटकात असून त्यांच्या हस्ते पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन केले जाणार आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

बेंगलुरू : कर्नाटकातील (Karnataka) आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) तयारी सुरू केली आहे. त्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज कर्नाटकात असून त्यांच्या हस्ते पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन केले जाणार आहे. त्याआधी पवारांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढत शक्तीप्रदर्शनही केले जाणार आहे. आगामी निवडणुकीत पक्षाकडून काही ठराविक मतदारसंघांमध्ये उमेदवार दिले जाणार असून त्याचीच ही तयारी असल्याचे सांगितले जात आहे.

कर्नाटकातही मराठी बांधव मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे पवारांनी प्रामुख्याने या भागावर लक्ष केंद्रीत केले आहेत. 2018 मध्येही राष्ट्रवादीचे उमेदवार विधानसभेच्या रिंगणात होते. रायबागा हुकेरी, बेळगाव उत्तर, सवादत्ती, विजयपुरा, सिंदगी, बसवकल्याण, रायचूर, शिराहत्ती, हुबळी-धारवाड, कारवार, बेल्लारी नगर, हरपनहल्ली आणि बेंगलुरूमधील महालक्ष्मी या मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार होते.

Sharad Pawar
राज ठाकरेंच्या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर वळसे पाटलांनी भोंग्यांबाबत घेतला मोठा निर्णय

2023 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवार दिले जाण्याची शक्यता आहे. त्याची तयारी वर्षभर आधीच सुरू झाली आहे. त्यासाठी पक्षाच्या बेंगलुरूतील बनसवाडी येथील कार्यालयाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते आज होणार आहे. दुपारी तीन वाजता कार्यक्रम आहे. त्याआधी देवनहल्ली ते पक्ष कार्यालयापर्यंत रॅली काढली जाणार आहे. सायंकाळी सहा वाजता ते माध्यमांशी संवाद साधणार असल्याचे समजते. कर्नाटकातील पक्षाची भूमिका व राजकीय स्थितीवर ते बोलू शकतात.

Sharad Pawar
राज ठाकरेंना आता मोदी सरकारकडून विशेष सुरक्षा? केंद्रीय पातळीवर हालचाली

आगामी निवडणुकीत बेंगलुरू शहरासह महाराष्ट व कर्नाटक सीमेवरील मतदारसंघात राष्ट्रवादीकडून उमेदवार उभे केले जाऊ शकतात. त्यामुळे पवारांच्या आजच्या कर्नाटक दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे. कर्नाटकात सध्या भाजपची सत्ता आहे. तर काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष असून धर्मनिरपेक्ष जनता दल (JDS) चीही मोठी ताकद आहे. भाजप सत्तेत येण्याआधी तिथे काँग्रेस व जेडीएसने हातमिळवणी केली होती. पण त्यांचं सरकार फारकाळ टिकलं नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com